Saam Banner Template (33).jpg 
एक्स्क्लुझिव्ह

एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला... ( पहा व्हिडिओ )

अक्षय कस्पटे

मुंबई : महाराष्ट्राच्या Maharashtra  राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. याचं कारण म्हणजे गेल्या तीन दिवसांमध्ये चालेल्या घडामोडी. देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार Sharad Pawar यांची २ दिवसांपूर्वी भेट घेतली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर गेले असता ते एकनाथ खडसेंच्या Ekntah Khadse घरी गेले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. Eknath Khadse meets Sharad Pawar

देवेंद्र फडणवीस हे खडसे यांच्या घरी गेल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा थांबत नाहीत, त्यातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. खडसे यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली. मुंबई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रिये पश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उदय सामंत हे पण उपस्थित होते असंही खडसे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

२ दिवसांपूर्वी  देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट सदिच्छा भेट होती असे  म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. असे असले तरी या भेटीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. फडणवीस यांनी ही भेट डॅमेज कंट्रोलसाठी घेतली का ? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, तसे काही नाही उलट डॅमेज कंट्रोलची गरज ही महाविकास आघाडी सरकारला आहे असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. Eknath Khadse meets Sharad Pawar

दरम्यान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले की, उत्तम विरोधी पक्ष म्हणून कसे काम केले पाहिजे याचं मार्गदर्शन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच केलं असेल असं म्हटले आहे. राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. सध्या संजय राऊत यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes Cleaning Tips: पांढऱ्या कपड्यांवर लागला दुसऱ्या कपड्याचा रंग? 'ही' घरगुती ट्रिक वापरून सहज करा स्वच्छ

विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल; धक्कादायक कारण आलं समोर

Diet Tips : Workout करण्याआधी हे पदार्थ खा मिळेल भरपूर एनर्जी

Accident News: भरधाव कारने मुलाला चिरडलं; 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू, मुंबईतील थरारक घटना

Healthy Street Food: हार्ट पेशन्ट आता हार्ट हेल्दी ठेवून घ्या स्ट्रीट फूडचा आनंद; डॉक्टरांनी सांगितले ५ पर्याय

SCROLL FOR NEXT