Dombivali Resident Bhausaheb Choudhary providing oxygen to Thane district
Dombivali Resident Bhausaheb Choudhary providing oxygen to Thane district 
एक्स्क्लुझिव्ह

आणीबाणीच्या काळात डोंबिवलीकर उद्योजक बनला ऑक्सिजन मॅन... 

प्रदीप भणगे

डोंबिवली : सध्या कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि ऑक्सिजनचा भासू लागलेला तुटवडा यामुळे सर्वत्र आणीबाणीची Emergency परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या परिस्थितीत डोंबिवलीकर Dombivli भाऊसाहेब चौधरी संपूर्ण जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा करत आहेत. Dombivali Industrialist Providing Oxygen to Whole Thane District

ठाणे Thane जिल्ह्यात सध्या जोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून रेमडेसिविर, ऑक्सिजन यांचा अनेक ठिकाणी तुटवडा भासतोय. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत डोंबिवलीकर पुन्हा एकदा तारणहार म्हणून उभं राहिला आहे. कारण डोंबिवली आणि अंबरनाथ एमआयडीसीतील MIDC भाऊसाहेब चौधरी यांच्या मॉडर्न गॅस कंपनीतून सध्या संपूर्ण जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे.

मॉडर्न गॅस कंपनीतून सध्या ठाणे महापालिका, कल्याण Kalyan डोंबिवली महापालिका, उल्हासनगर Ulhasnagar महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, वसई विरार महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका यांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो आहे. या महापालिका आणि नगरपालिकांनी उभारलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये पुरेसा प्राणवायू वेळेत पोहोचवण्यासाठी सध्या मॉडर्न कंपनीचे कामगार रात्रंदिवस झटत आहेत. Dombivali Industrialist Providing Oxygen to Whole Thane District

या कंपनीतून दिवसाला ४० ते ४५ टन ऑक्सिजन पुरवठा केला जातोय. यामध्ये सर्वाधिक पुरवठा हा ठाणे महापालिकेच्या बाळकुम जम्बो कोव्हीड सेंटरला केला जातोय. दिवसाला १५ टन ऑक्सिजन हा एकट्या बाळकुम जम्बो कोव्हीड केअर सेंटरला केला जातोय. तर इतर ठिकाणीही गरजेनुसार ऑक्सिजन पुरवला जातो आहे. दिवसाला ८० ते ९० लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर आणि ८०० ते १००० जम्बो आणि लहान सिलेंडर या कंपनीत भरले जातात. यासाठी तळोजा इथल्या लिंडे कंपनीतून ऑक्सिजन मागवला जातो आणि तो वितरित केला जातो.

या कंपनीचे मालक भाऊसाहेब चौधरी हे डोंबिवली रहिवासी असून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख असून शिवसेना नेते संजय राऊत यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. मागील ३० वर्षांपासून भाऊसाहेब चौधरी हे या व्यवसायात आहेत. पूर्वी हॉस्पिटल आणि औद्योगिक अशा दोन्ही ठिकाणी ते ऑक्सिजन पुरवठा करायचे. मात्र कोरोना आल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे वैद्यकीय उपयोगासाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू केला. Dombivali Industrialist Providing Oxygen to Whole Thane District

विशेष म्हणजे भाऊसाहेब चौधरी यांनी कोविड काळात अनेक गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मोफत दिले आहेत आणि लॉकडाऊन मध्ये मोफत धान्य वाटप, मदत सुद्धा केली आहे. त्यातही मागच्यावर्षी आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा या वर्षीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी २ ते ३ पट वाढल्याचं ते भाऊ  सांगतात. तसंच ऑक्सिजनचा वापर रुग्णालयांनीही जपून करण्याचं आवाहन ते करत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT