Anil Parab
Anil Parab 
एक्स्क्लुझिव्ह

देशमुखांवरील FIR नंतर शिवसेनेला आता अनिल परबांची चिंता?

रामनाथ दवणे

मुंबई : अनिल देशमुख Anil Deshmukh यांची वरील सीबीआय चौकशी अधिक गतीने सुरू असल्याची चाहूल राष्ट्रवादी NCP आणि शिवसेनेला Shivsena होती, अशी माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,पोलीस महासंचालक संजय पांडे Sanjay Pande यांनी भेट घेतली होती. या बैठकीत माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या चौकशी विषयी चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. After Anil Deshmukh FIR Shivsena now worried about Anil Parab

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात महासंचालक अधिकारी संजय पांडे ही चौकशी करतआहेत. सचिन वाझे यांनी सीबीआयला दिलेल्या पत्रातून शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचेही  नाव समोर आल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता बोलली जाते आहे. याविषयीही या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर छापे मारल्यानंतर गृह मंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. एकीकडे सीबीआय कडून अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढत आहेत, तर सचिन वाझे Sachin Waze याच्या पत्रातील अनिल परब Anil Parab यांचा उल्लेख आल्याने राज्य सरकार कडून माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची चौकशीही जलद गतीने करण्याची धडपड सुरू आहे. After Anil Deshmukh FIR Shivsena now worried about Anil Parab

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची मिडियासमोर बाजू मांडतांना कमी पडत आहेत. अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या सोबत कायम राहील असे शरद पवार Sharad Pawar काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ,आणि स्वतः अनिल देशमुख या भेटीच्या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्या नंतर अनिल परब यांच्या अडचणी वाढणार का? यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayat Patil यांनी अनिल देशमुख यांच्यावरील एफआयआरबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, "महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या CBI चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली,'' After Anil Deshmukh FIR Shivsena now worried about Anil Parab

पाटील पुढे म्हणाले, "मा.  उच्च न्यायालयाने High Court केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो,''
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT