बॉलिवूडची हिट जोडी रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचे चित्रपट चाहत्यांना खूप आवडतात. चित्रपटातील यांची केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालते. त्यांनी एकत्र केलेला 'गली बॉय'हा खूप हिट झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई केली आहे. 'गली बॉय' चित्रपट 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची आजही तरुणाईमध्ये क्रेझ पाहायला मिळते.
'गली बॉय' या चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह आणि बॉलिवूडची शनाया आलिया भट्ट (Alia Bhatt ) झळकले होते. 'गली बॉय'चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली. सध्या सर्वत्र 'गली बॉय 2'ची (Gully Boy 2) चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही चित्रपटाची मुख्य कास्ट निश्चित झाली नाही. यावरून अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. असे बोले जात आहे की, 'गली बॉय 2' चित्रपटातून रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाचा पत्ता कट होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'गली बॉय 2'मध्ये रणवीर आणि आलियाची जागा बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal ) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) घेणार आहे. ही फ्रेश जोडी 'गली बॉय 2'मध्ये पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. 'गली बॉय' चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि रॅप सर्वच खूप भन्नाट आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. हा चित्रपट मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या रॅपच्या जीवनावर आधारित आहे.
'गली बॉय 2' चित्रपटाचे दिग्दर्शन अर्जुन वरेन करणार आहेत. एकीकडे 'गली बॉय 2'मध्ये रणवीर आणि आलिया पाहायला मिळणार नाही म्हणून त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे विकी कौशल आणि अनन्या पांडेचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे. त्यामुळे 'गली बॉय 2'मध्ये मुख्य भूमिकेत कोण झळकणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.