'बिग बॉस 18' चा (Bigg Boss 18) गेम आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. प्रत्येकजण ट्रॉफी उचलण्यासाठी खेळताना दिसत आहे. नुकताच घरात 'वीकेंड का वार' यात सलमान खानने (Salman Khan) घरातील सदस्यांची शाळा घेतली. तर काहींचे कौतुक केले. हा 'वीकेंड का वार' खूप मनोरंजक ठरला. यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. घरातील सदस्यांनी क्रिकेटरसोबत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.
'वीकेंड का वार'ला क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) , शशांक सिंह (Shashank Singh) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आले. या तिघांनी भाईजानशी संवाद साधला. त्याच्या कामाचे कौतुक केले. तसेच सलमान खानने 'पंजाब किंग्स' बद्दल बोलून मोठी घोषणा केली. सलमान खानने श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून घोषित केले. आयपीएल संघाने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला.
भारतीय क्रिकेटरनंतर घरात गेले. घरातील सदस्यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्यासोबत एक छोटी क्रिकेट मॅच खेळली. घरात दोन टीम पाडल्या गेल्या. एका टिमचा कॅप्टन श्रेयस अय्यर होता तर दुसऱ्या टिमचा कॅप्टन युझवेंद्र चहल होता. युझवेंद्र चहलच्या टीममध्ये करण वीर मेहरा आणि शशांक सिंह होते. तर श्रेयस अय्यरच्या टीममध्ये विवियन डिसेना आणि रजत दलाल होते. तर अविनाश मिश्रा कॉमेंट्री देत होता.
मॅचमध्ये करण वीर आणि विवियन एकमेकांनी फेकलेल्या बॉल्सवर चौकार-षटकार लगावताना पाहायला मिळाले. तर युझवेंद्र चहल, श्रेयस अय्यर आणि शशांक सिंहने भाईजान सोबत भन्नाट डान्स देखील केला. सलमान खानच्या 'ढिंक चिका ढिंक चिका' या गाण्यावर या चौघांनू भन्नाट डान्स केला. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार आणि 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी कोण उचलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.