Vishal Gangurde
भारतीय टीमचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
युझवेंद्र चहलने सोशल मीडियावरील धनश्री वर्माचे फोटो हटवले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
भारतीय टीमचा खेळाडू चहलने पत्नी धनश्रीसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरन हटवले आहेत. धनश्रीचे सर्व फोटो हटवल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनश्री आणि युझवेंद्र लग्नबंधनातून एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात, असा दावा केला जात आहे
घटस्फोटांच्या चर्चांवर दोघांनी अधिकृत भाष्य केलेलं नाही.
धनश्री वर्माचा काळ्या साडीतील फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.