Zeenat Aman Reveals She Took Loans For Designer Clothes And Jewellery Instagram
मनोरंजन बातम्या

Zeenat Aman: झीनात अमान जगताय उधारीचं जीवन; तरुणांनाही दिला सुखी जीवनाचा कानमंत्र

Zeenat Aman News: झीनत अमान यांनी आपल्या पोस्टमध्ये त्या स्वत: कपडे आणि दागिने उधारीवर घेतात, असं विधान केलं आहे.

Chetan Bodke

Zeenat Aman Reveals She Took Loans For Designer Clothes And Jewellery

झीनत अमान नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्या स्वत: कपडे आणि दागिने उधारीवर घेतात, असं विधान केलं आहे. सध्या त्यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये झीनत यांनी मुलासोबत आणि सुनेसोबत एक फोटो शेअर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

झीनत अमान यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही लग्न खूप साध्या पद्धतीने केलं. लग्नानंतर आम्ही सिंगापूरला पळून आलो आणि तिथे दोन साक्षीदारांसमोर लग्न केले. भारतामध्ये लग्नसोहळ्याला खूपच महत्व आहे. मोठ्या थाटामाटामध्ये लग्नसोहळा पार पडतो. भारतीय जेवण, संगीत, रंग, सर्वत्र आनंददायी वातावण आपल्याला आकर्षित करतो. मी शेअर केलेला हा फोटो मागील आठवड्यातील आहे. मी माझी फॅमिली दिल्लीतल्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. मला त्या वेळेचं गुपित तुमच्यासोबत शेअर करायचं आहे.”

झीनत अमान आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितात, “मी वेगवेगळ्या फंक्शनसाठी फॅन्सी कपडे घालते. माझे ते कपडे उधारीवर घेतलेले असते. त्यासोबतच माझे दागिनेही मी उधारीवर घेते. तरुणांनी कपड्यांवर जास्त पैसे खर्च करु नये, त्यासाठीच मी ही गोष्ट शेअर केली आहे. तरुणांनी कपड्यासाठी आपलं बँक अकाऊंट रिकामे करु नये. जर तुम्हाला चांगले कपडे घालायचे असतील, तर ते उधारीवर घेऊन कपडे घाला. यावेळी घातलेला निळ्या रंगाचा घातलेला शरारा मैत्रिण मोहिनी छाब्रियाकडून घातले आहे. तर घातलेले दागिने विमलकडून उधारीवर घेतलेय. तो शरारा मी तिला ड्राय क्लिन करुन परत देणार आहे.”

पुढे आपल्या पोस्टमध्ये झीनत लिहितात, “ ही माहिती सांगण्यामागचे कारण म्हणजे, तरुणांना नवीन कपडे खरेदी करण्याचे दडपण येऊ नये यासाठी मी सांगितले. फॅन्सी ड्रेससाठी सेलिब्रिटींचे पैसे खर्च होऊ नयेत,यासाठी मी सांगितले. तुम्ही लोन घ्या, खर्च करा किंवा खरेदी करा, पण तुम्ही तुमच्या बँक बॅलन्समधून पैसे खर्च करत नाही, हे महत्त्वाचे आहे. आपण जे कपडे परिधान करतो त्याचा आनंद घेतो. माझ्या आयुष्यात आराम ही खूप महत्वाची गोष्ट आहे.”

झीनत अमानने फेब्रुवारी २०२३ मध्ये आपलं सोशल मीडिया अकाऊंट क्रिएट केलं. तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावर चर्चा होते. झीनत यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक हिट चित्रपट दिले होते. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पानिपत’ चित्रपट हा अखेरचा चित्रपट ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT