अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्र रिश्ता या मालिकेमुळे भारतातील घराघरात पोहोचली. अंकिताने या मालिकेदरम्यानचा आठवण शेअर केला आहे. या मालिकेला खूप मागणी होती. प्रेक्षकांनी मालिका चक्क डोळयांवर घेतली होती. त्यामुळे अंकिता सलग १४८ तास काम करावं लागलं होत.
अंकिताने टीव्ही टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी पवित्र रिश्ता या मालिकेसाठी काम करताना जेवढे कष्ट गेहटले आहेत तेव्हढे मी आयुष्यात कोणत्याच कामासाठी घेतले नाहीत. मी तीन महिने घरी देखील गेले नव्हते.'
अंकिता लोखंडेने पुढे सांगितले, 'मी दिवस - रात्र शूट करायचे. तिथे फक्त जेन्टस बाथरूम होते, मी तिथे अंघोळ करायचे. ते लोक माझ्यासाठी बाथरूम रिकामं ठेवायचे. माझी हेअरड्रेसर माझे कपडे इस्त्री करायची. अनेकदा आमचे अंडरगार्मेंट देखील फ्रेश नसायचे. आम्ही ते वापरायचो आणि धुवून इस्त्री करायचो.'
ते कराच वर्थ होत. फक्त ३० तास नाही, पवित्र रिश्ताच्या सेटवर मी सलग १४८ तास काम केलं आहे. इअटके तास काम केल्याचा माझ्याच रेकॉर्ड आहे.
म्हणून खूप छान वाटतं, मी खूप मेहनत केली आहे हे लोकांना सांगण्यासाठी माझ्याकडे एक स्टोरी आहे. माझी आईही माझ्यासोबत तिथेच राहिली. (Latest Entertainment News)
आम्हाला वेळ मिळायचा पण असे होते की आम्ही झोपायचो आणि लगेच उठायचो. परंतु त्यांनी मला घरी जाऊ दिले नाही कारण मला बॅक तो बॅक सीन करायचे होते. आणि टेलिव्हिजनमध्ये स्त्रिया शो चालवतात आणि मी प्रत्येक सीनमध्ये होतो.'
पवित्र रिश्ता या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत देखील होता. त्याने देखील या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. नुकतेच या मालिकेला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.