Veen Doghatli Hi Tutena Marathi Serial: Saam tv
मनोरंजन बातम्या

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी–समरची लग्नगाठ बांधली जाणार पण...; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये येणार नवा ट्विस्ट

Veen Doghatli Hi Tutena Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या चर्चेत आली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मोठं ट्विस्ट दाखवण्यात आलं आहे.

Shruti Vilas Kadam

Veen Doghatli Hi Tutena Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या चर्चेत आली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मोठं ट्विस्ट दाखवण्यात आलं असून स्वानंदी आणि समरचं लग्न होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोघांचं लग्न मालिकेतील पुढील भागात पार पडणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रोमोमध्ये दाखवलं आहे की, स्वानंदी आणि समर सात फेऱ्या घेतात आणि लग्नानंतर दोघेही एकमेकांकडे बघत मनात विचार करतात “ठरवून लग्न झालं, पण प्रेम होईल का?” या भावनिक संवादामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मालिकेत आधी दाखवलं गेलं होतं की रोहन आधी स्वानंदीचं लग्नासाठी व्हाव अशी अट घालतो. त्यामुळे परिस्थितीमुळे समर आणि स्वानंदी एकत्र आले. जरी हे लग्न परिस्थितीजन्य असलं तरी त्यांच्या नात्यात पुढे प्रेम कसं फुलतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.

झी मराठीने हा प्रोमो शेअर करत लिहिलं, “स्वानंदी आणि समरची सात जन्मांची गाठ बांधली जाणार. लग्न होणार, पण प्रेम?” या प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या नव्या वळणाचं स्वागत केलं आहे.

एका प्रेक्षकाने लिहिलं, “खूप सुंदर प्रोमो आहे. स्वानंदी आणि समरचं नातं आता अधिक घट्ट होणार.” तर दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “अभिनय, संवाद आणि भावना अप्रतिम पकडल्या आहेत.” ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील या नव्या ट्विस्टमुळे कथानक नव्या टप्प्यावर पोहोचलं आहे. आता लग्नानंतर स्वानंदी आणि समरच्या नात्यात प्रेम फुलणार का, हे पाहणं रंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही चकाकली; सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

Maharashtra Live News Update: अलिबाग वडखळ मार्गावर ट्रॉफिक जाम,१० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Mumbai Tourism : ट्रेकिंग, सायकलिंग अन् बोटिंगचा मनमुराद आनंद लुटा, मुंबईत आहे 'हे' खास लोकेशन

'या' पक्षाची यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू? VIDEO

Fruit Custard Recipe: नविन वर्षाची सुरुवात करा टेस्टी डिशने घरच्या घरी बनवा फ्रूट कस्टर्ड,वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT