नवीन मालिकांची नावे काय?'झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत.
मालिकांची नावे, रिलीज तारीख आणि वेळ सविस्तर माहिती वाचा.
नवीन मालिकेमधून मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'मालिका' या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या 'झी मराठी' वाहिनीवर नवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या मालिकांची कथा आणि कलाकार दोन्ही खूपच हटके आहेत. नवीन मालिकांची नावे आणि त्या कधी पासून पाहता येणार सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 'झी मराठी' वर 'वीण दोघांतली ही तुटेना' (Vin Doghantali Hi Tutena) आणि 'तारिणी' (Tarini ) या दोन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत आहेत.
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून दमदार कमबॅक करणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत मराठमोळा अभिनेता सुबोध भावे झळकणार आहे. मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदार आणि सुबोध भावे समर राजवाडे यांच्या भूमिका साकारणार आहेत. या मालिकेची कथा खूपच रंजक आहे. स्वानंदी आणि समर आपल्या भाऊ-बहीणांना लग्न करता यावे, म्हणून स्वतः लग्नबंधनात अडकतात. या मालिकेत स्वानंदीच्या भावाची भूमिका अभिनेता राज मोरे आणि सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत पूर्णिमा डे झळकणार आहे.
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात आशय कुलकर्णी, सुलभा आर्या, किशोर महाबोले, भारती पाटील, शर्मिला शिंदे, किशोरी अंबिये आणि सानिका काशीक यांचा समावेश आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका 11 ऑगस्टपासून संध्याकाळी 7.30 वाजता पाहायला मिळणार आहे.
शिवानी सोनार मुख्य भूमिकेत असलेली नवीन मालिका 'तारिणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी सोनार 'तारिणी' मालिकेत क्राइम युनिट ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेत शिवानी डॅशिंग अंदाजात पाहायला मिळणार आहे. 'तारिणी' मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून स्वराज नागरगोजे झळकणार आहे.
'तारिणी' मालिकेत रागिणी सामंत, सुवेधा देसाई, रुपाली मांगले, अभिज्ञा भावे, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे, पंकज चेंबूरकर, निकिता झेपाले आणि अंजली कदम हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'तारिणी' मालिका 11 ऑगस्टपासून रात्री 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे.
नवीन मालिका कोणत्या वाहिनीवर सुरू होणार?
झी मराठी
नवीन मालिका कधीपासून पाहता येणार?
11 ऑगस्ट
नवीन मालिकांची नावे काय?
'वीण दोघांतली ही तुटेना' आणि 'तारिणी'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.