Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023 Winner Instagram
मनोरंजन बातम्या

Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023 Winner: कोपरगावच्या गौरी पगारेने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या जेतेपदावर कोरलं नाव, होतोय कौतुकाचा वर्षाव

Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या पर्वाची गौरी पगारे ही महविजेती झाली आहे.

Chetan Bodke

Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023 Winner

झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा नुकताच ग्रँड फिनाले मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी मराठी सिनेसृष्टीला एक नवीन गायक मिळाला आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या पर्वाची गौरी पगारे ही महविजेती झाली आहे.

ही स्पर्धा एकूण सहा स्पर्धकांमध्ये रंगली होती. श्रावणी वागळे, हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, देवांश भाटे, गीत बागडे आणि गौरी अलका पगारे या टॉप ६ स्पर्धकांचा समावेश होता. यंदाच्या पर्वाबद्दल बोलायचे तर, या पर्वाची ‘गुरुकुल’ म्हणून थीम होती. कार्यक्रमामध्ये परिक्षकातच्या भूमिकेत ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘वैशाली भैसने’ हे दोघे जणं होते. यांच्यासोबत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर सुद्धा होते.

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चे जेते पद परिक्षक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णीसह मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला विजेती म्हणून घोषित केले. गौरी पगारे बद्दल सांगायचे तर, ती मुळची कोपरगावची आहे. कठोर परिश्रमातून लहान वयातच तिने गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. गौरी एका शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suvendu Adhikari: उड्डाण भरताच तांत्रिक बिघाड; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

ना गाडी, ना ट्रेन...थेट १ हजार किलोमीटर पायी प्रवास! महाराष्ट्रातून निघालेल्या 'या' चाहत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

Maharashtra Cabinet : मुद्रांक शुल्कात मोठी सूट, फडणवीस सरकारनं घेतले ८ धडक निर्णय, वाचा एका क्लिकवर

Savings Account : बचत खात्यावर किती पैसे ठेवता येतात? तुमच्या व्यवहारांवर असेल आयकर विभागाची नजर, जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: विजय थलापतीचा जबरा फॅन, थलापतीला भेटण्यासाठी निघाला देगलूरहून पायी यात्रेवर

SCROLL FOR NEXT