Zee Chitra Gaurav Award 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zee Chitra Gaurav Award 2024: चमचमत्या ताऱ्यांचा झगमगता सोहळा पाहायला मिळणार, ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ कधी आणि कुठे पाहता येणार ?

Chetan Bodke

Zee Chitra Gaurav Award 2024

सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरस्कार सोहळ्यांची जोरदार चर्चा होत आहे. मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही सध्या पुरस्कार सोहळ्यांची चर्चा सुरू आहे. नुकतंच झी मराठीचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळा पार पडला. सध्या या पुरस्कार सोहळ्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा नेहमी प्रमाणेच खास असणार आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्रींनी उपस्थिती लावली आहे. शिल्पा शेट्टी आणि सारा अली खानने यावेळी खास मराठमोळ्या अंदाजामध्ये उपस्थिती लावत सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी दोघींनी खास स्टेज परफॉर्मन्स देखील केला होता. यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे स्टेज परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. यावेळी अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींना महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

अनेक मराठमोळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. वाळवी, बाईपण भारी देवा, झिम्मा २ आणि सुभेदार या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' या पुरस्कारासाठी तब्बल सहा अभिनेत्रींना हा पुरस्कार विभागून दिलेला आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटातल्या सहा बहिणींनाही 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुकन्या कुलकर्णी-मोने, दीपा परब, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हट्टंगडी या अभिनेत्रींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आहे.

तर केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटातून सना शिंदेने मराठी सिनेसृष्टीमध्ये डेब्यू केलं होतं. सना शिंदेही दिग्दर्शक केदार शिंदेंची लेक आहे. अभिनेत्रीला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.

‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यांनी उपस्थिती लावली होती. नुकतंच हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. येत्या शनिवारी अर्थात १६ मार्च रोजी झी मराठीवर ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ सोहळा सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार सोहळा टेलिकास्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

Shirdi Saibaba : साई चरणी ६८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ब्रोच अर्पण

SCROLL FOR NEXT