Shilpa Shetty And Sara Ali Khan Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty ने 'वाजले की बारा' आणि Sara Ali Khan ने 'ऐका दाजीबा'वर लावले जबरदस्त ठुमके, पाहा VIDEO

Shilpa Shetty And Sara Ali Khan Dance Video: मराठमोळ्या लूकमध्ये शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान खूपच सुंदर दिसत होत्या. या सोहळ्यामध्ये दोघींनीही जबरदस्त डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघींच्याही डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Zee Chitra Gaurav Awards 2024:

'झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 2024' नुकताच मुंबईमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), सारा अली खान (Sara Ali Khan) यांनी हजेरी लावली. मराठमोळ्या लूकमध्ये शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान खूपच सुंदर दिसत होत्या. या सोहळ्यामध्ये दोघींनीही जबरदस्त डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघींच्याही डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 2024 मध्ये शिल्पा शेट्टी आणि सारा अली खानने हजेरी लावत चार चाँद लावले. या दोघींमुळे या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यावेळी मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या. शिल्पा शेट्टीने पांढऱ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. नाकामध्ये नथ, मोकळे केस, कपाळावर चंद्रकोर लावलेली शिल्पा शेट्टी यावेळी खूपच सुंदर दिसत होती. शिल्पाने या सोहळ्यामध्ये 'वाजले की बारा' या गाण्यावर ठेका धरला. तिने या गाण्यावर अप्रतिम डान्स केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

सारा अली खानने या सोहळ्यामध्ये 'ऐका दाजीबा' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी साराने पांढऱ्या रंगाची नववारी साडी आणि गुलाबी रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. यावेळी साराने नाकामध्ये नथ, कपाळावर चंद्रकोर, केसाचा बन, गळ्यामध्ये ठुशी आणि कानात झुमके घालून तिने आपला लूक परिपूर्ण केला. साराने यावेळी 'ऐका दाजीबा' या गाण्यावर जबरदस्त डान्स करत सर्वांचे मन जिंकले.

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील सारा अली खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी सारा म्हणते की, 'नमस्ते प्रेक्षकहो, मी सारा अली खान. मला इथे येऊन वाटते खूप छान. झी मराठी आहे महाराष्ट्राची शान, काय पाहुणं आला का बाण.' साराच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT