Zee Chitra Gaurav Puraskar Sohala Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zee Chitra Gaurav Puraskar: 'पार्टी तर होणारच'; झी चित्र गौरव पुरस्काराच्या रौप्यवर्ष सोहळ्याचा शुभारंभ

Zee Chitra Gaurav Puraskar Sohala: झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे हे रौप्यवर्ष असून या वर्षाच्या कार्यक्रमाची धुरा रितेश देशमुख आणि अमेय वाघची जोडी संभाळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Zee Chitra Gaurav Puraskar: मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव २०२५’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, झी गौरव पुरस्काराच्या २५ वर्षांचा समृद्ध इतिहासासह, यावेळी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ च्या रेड कार्पेटवर मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या दिग्गज कलाकारांनी अशोक सराफ, निवेदिता, सुप्रिया आणि सचिन पिळगावकर, शुभांगी गोखले, महेश मांजरेकर, भरत जाधव, महेश कोठारे हे आणि इतर दिगज्जांनी ह्या कार्यक्रमाला चारचाँद लावले.

रेड कार्पेटवर त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची भव्यता आणि शोभा वाढवत होती. त्याचसोबत अक्षया देवधर, शरयू सोनवणे, वल्लरी विराज, पूर्वा कौशिक आणि प्राप्ती रेडकर या झी मराठीच्या नायिकांनी श्रेयस तळपदे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीला ट्रिब्यूट दिले. मराठी चित्रसृष्टीच्या न संपणाऱ्या वारशाची सर्वांना आठवण करून देणारा हा हृदयस्पर्शी क्षण होता.

रितेश देशमुख आणि अमेय वाघ या प्रतिभावान आणि करिश्माई जोडीने यावर्षीच झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ होस्ट केला. त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या दोघांची धमाल आणि ऊर्जा हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होते, यामुळे उपस्थित सर्वांसाठी हा एक मनोरंजक आणि अविस्मरणीय अनुभव होता.

प्राजक्ता माळी, वैदेही परशुरामी, प्रार्थना बेहरे, प्रियदर्शनी इंदलकर, अमृता सुभाष, अनुष्का दांडेकर, हर्षदा खानविलकर, भूषण प्रधान, आदिनाथ कोठारे आणि इतर अनेक ग्लॅमरस कलाकारांनी झी चित्र गौरवच रेड कार्पेटवर हजेरी लावली. यंदाचा 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२५' मराठी चित्रपटाचा खरा उत्सव होता, ज्याने अनेक दशकांपासून प्रेक्षकांना भुरळ घालत असलेल्या मराठी सिनेश्रुष्टीची ग्लॅमर, प्रतिभा यांचा वारसा दर्शविला.'झी चित्र गौरव २०२५' पुरस्काराच्या अविस्मरणीय क्षणांचे आणि दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार व्हा. ८ मार्च रोजी संध्या. ७ वाजता फक्त झी मराठीवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT