Shah Rukh Khan Birthday Special  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मिळणार अनोखी भेट, सर्वात सुपरहिट चित्रपट पुन्हा पाहता येणार

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म्सने एक सरप्राईज प्लॅन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shah Rukh Khan Birthday Special: शाहरुख खान यावर्षी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांच्या बहुप्रतिक्षित 'पठान' चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर,२०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. संपूर्ण बॉलिवूड त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहे. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सने निर्मिती केलेला 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार अशी सगळ्यांना अपेक्षा आहे.

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म्सने आणखी एक सरप्राईज प्लॅन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'यशराज फिल्म्स शाहरुख खान-स्टार दिलवाले 'दुल्हनिया ले जायेंगे', 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा प्रदर्शित करणार आहेत. हा सिनेमाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चाललेला चित्रपट आहे. यशराज फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे.' (Movie)

20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा लॉकडाऊन वगळता 27 वर्षांपासून मुंबईतील मराठा मंदिर सिनेमात सतत चालू आहे. 'मराठा मंदिराव्यतिरिक्त, 2 नोव्हेंबरला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट देशभरातील अनेक पीवीआरमध्ये प्रदर्शित केला जाईल. इतकेच नाही तर त्याचे शुल्क देखील नाममात्र असणार आहेत. बहुतेक शोची तिकिटे १०० आणि ११२ रुपयांमध्ये उपलब्ध असतील. ऑनलाइन बुकिंग आधीच सुरू झाले आहे. सध्या मुंबई, दिल्ली एनसीआर, कोलकाता, कानपूर, अहमदाबाद, लखनौ, पुणे आणि सुरत या 8 शहरांतील पीवीआर चित्रपटगृहांनी बुकिंग सुरू केले आहे. येत्या काही दिवसात अधिक शहरांमध्ये शो उपलब्ध होतील, तसेच वरील 8 शहरांमधील शो वाढणार आहेत', असे सूत्रांनी सांगितले आहे. (Bollywood)

Pathan And DDLJ Release

शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना 'पठाण'च्या टीझरचा डिजिटली आनंद घेता येणार आहे तर मोठ्या पडद्यावर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'. (Shah Rukh Khan)

शाहरुख खान व्यतिरिक्त पठाणमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात रिलीज होणाऱ्या पठाणमध्ये सलमान खान टायगरच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT