YouTuber PC Siqueira Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

PC Siqueira Passes Away: प्रसिद्ध YouTuber ने संपवलं जीवन, चाइल्ड पोर्नोग्राफीचा होता आरोप

YouTuber PC Siqueira Passes Away: एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध YouTuber ने अगदी लहान वयात स्वतःचं जीवन संपवलं आहे. गंभीर आरोपांमुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Satish Kengar

YouTuber PC Siqueira Passes Away:

एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध YouTuber ने अगदी लहान वयात स्वतःचं जीवन संपवलं आहे. गंभीर आरोपांमुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्ध ब्राझिलियन यूट्यूबर पीसी सिक्वेरा, ज्यांचे खरे नाव पाउलो सेझर गौलार्ट सिक्वेरा (Paulo Cezar Goulart Siqueira) आहे. त्याने आता या जगाचा निरोप घेतला आहे. त्याची मैत्रीण मारिया वतनबे हिला तो त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला.

मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय पीसी सिक्वेरा याने आपल्या मेहनतीच्या जोरावर YouTuber वर 20 लाख सबस्क्राइबर्स मिळवले होते. त्याचे चाहते ही त्याच्या निधनाच्या बातमीने दुःखात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की, जीवन संपवण्यापूर्वी तो एका मोठ्या वादात अडकला होता. त्याच्यावर चाइल्ड पोर्नोग्राफीसारखे गंभीर आरोप होते. याप्रकरणी तपास सुरू होता. 2020 मध्ये जेव्हा त्याचे खाजगी मेसेज लीक झाले तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याने हे आरोप स्पष्टपणे फेटाळले होते.  (Entertainment News)

अनेक आरोपांनंतर त्याच्या प्रतिमेला धक्का बसला होता. यानंतर त्याने त्याचे यूट्यूब चॅनलही डिअॅक्टिव्हेट केले होते. त्याचे मित्रही त्यापासून अंतर पळत होते. तसेच त्याला मिळाले अनेक प्रोजेक्टही त्याच्या हातून निघाले होते. यामुळे तो खूप निराश होता.

असं असलं तरी त्याच्यावर झालेल्या आरोपांमध्ये पोलिसांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. यापूर्वीही या वर्षाच्या सुरुवातीला पीसी सिक्वेरा याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वाचवले. त्यानंतर त्याने त्या लोकांचे आभारही व्यक्त केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक आलं; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

अपघात की घातपात? शिंदे गटाच्या माजी आमदाराला वाहनाने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT