Elvish Yadav In Money Laundering Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Elvish Yadav In Money Laundering Case : युट्यूबर एल्विश यादवची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chetan Bodke

युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी विजेतचा एल्विश यादव गेल्या अनेक दिवसांपासून तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणानंतर आता एल्विश मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. ईडीचं लखनऊमधील झोनल ऑफिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळ एल्विशची चौकशी करणार आहे. २ नोव्हेंबरला नोएडामध्ये दाखल करणाऱ्या तक्रारीचा आधार घेऊन त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'बिग बॉस ओटीटी २' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर कायमच एल्विश कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एल्विश सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणी चर्चेत होता. त्यानंतर आता तो मनी लाँड्रिंग प्रकरणी चर्चेत आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोबतच, त्याकडे असलेल्या महागड्या गाड्यांच्या कलेक्शनबाबतही ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे.

१७ मार्च रोजी, एल्विशला नोएडा पोलिसांनी सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या तो बाहेर असतानाच ईडी पुन्हा एकदा त्याला अटक करण्याच्या तयारीत आहे. ईडी चौकशीबद्दल एल्विश किंवा त्याच्या कुटूंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विशने स्वत:ला तो निर्दोष असल्याचे म्हणाला आहे.

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने माध्यमांसोबत संवाद साधला होता. त्यावेळ त्याने मला मिळालेलं यश लोकांना बघवत नाहीये, म्हणून त्याला काहीही कारणाशिवाय अडकवलं जात असल्याचं तो म्हणाला आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये दिल्ली पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. या पार्टीमध्ये 20 ml सापाचं विष हस्तगत करण्यात आलं होतं. या प्रकरणातही एल्विशचं नाव समोर आलं होतं. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT