Elvish Yadav: मी निर्दोष, कट रचून मला अडकवलं, रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादवची ५ तास चौकशी

Elvish Yadav Inquiry By Noida Police: आज पोलिस त्याची पुन्हा चौकशी करणार आहेत. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
Elvish Yadav
Elvish Yadav Instagram
Published On

Bigg Boss OTT 2:

'बिग बॉस ओटीटी 2' चा (Bigg Boss OTT 2) विनर एल्विश यादव (Elvish Yadeav) सध्या अडचणीत आहे. एल्विशवर सापाच्या विषाची तस्करी आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोपा करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत नोएडा पोलिसांनी त्याला अटकही केली. याप्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे.

मंगळवारी नोएडा पोलिसांनी (Noida Police) एल्विश यादवची तब्बल ५ तास चौकशी केली. त्यांची चौकशी अद्याप संपली नाही. आज पोलिस त्याची पुन्हा चौकशी करणार आहेत. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादवचे नाव आल्यापासून त्याचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. नोएडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अलीकडेच याप्रकरणी एल्विशची चौकशी करण्यात आली. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नोएडा सेक्टर-२० पोलिस स्टेशनमध्ये एल्विश यादवची चौकशी सुरू झाली. ही चौकशी पाच तास चालली.

या चौकशीदरम्यान एल्विश यादवने नोएडा पोलिसांना सांगितले की, 'मी निर्दोष आहे आणि मला एका कटात अडकवण्यात आले आहे.' सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे नोएडा पोलिसांनी सांगितले. तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी नुकताच पोलिसांनी गायक फैजलपुरियालाही नोटीस पाठवली होती.

Elvish Yadav
Rashmika Mandanna Deepfake Video: रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडीओतील खरी महिला आली समोर, दिली पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, याप्रकरणी एल्विश यादवसह ६ जणांवर रेव्ह पार्टीदरम्यान सापाच्या विषाचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. गेल्या दोन दिवसांत या प्रकरणात अनेक ट्विस्ट आणि टर्न आले आहेत. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी आधी ५ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी एल्विशला देखील अटक केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहे.

Elvish Yadav
Elvish Yadav च्या पार्टीत खरंच सापांचे विष आणि परदेशी मुली असायच्या का?, मित्र DG Immortals ने सांगितलं सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com