youtuber chhavi varshney passes away at age 23  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा २३व्या वर्षी दुर्दैवी अंत; महाकालच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, आईचाही मृत्यू

Famous Youtuber Death: लोकप्रिय युट्यूबर छवी वार्ष्णेयचा मध्य प्रदेशातील भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या आईचाही मृत्यू झाला असून वडील आणि दोघे गंभीर जखमी झाले.

Shruti Vilas Kadam

Famous Youtuber Death: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रहिवासी आणि लोकप्रिय युट्यूबर छवी वार्ष्णेयचा मध्य प्रदेशातील रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. २३ वर्षीय छवीचे यूट्यूबवर ७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स होते. या अपघातात तिच्या ५० वर्षीय आई सारिका यांचाही मृत्यू झाला. मंगळवारी हा भीषण अपघात घडला असून, या घटनेमुळे हाथरस परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छवी वार्ष्णेय सोमवारी रात्री उशिरा आपल्या कुटुंबीयांसह उज्जैन येथील महाकाल मंदिरात दर्शनासाठी निघाली होती. तिच्यासोबत वडील श्यामलाल, आई सारिका, नातेवाईक सूरजपाल आणि कार चालक सचिन होते. उज्जैन-गरोठ या चारपदरी महामार्गावर रामखेडी गावाजवळ त्यांच्या कारची पुढे चालणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात छवी आणि तिच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बारोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींचे मृतदेह एनएचएआयच्या रुग्णवाहिकेतून बारोड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

या दुर्घटनेत छवी यांचे वडील श्यामलाल, नातेवाईक सूरजपाल आणि चालक सचिन हे गंभीर जखमी झाले आहेत. बारोड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात डॉ. विजेंद्र चुडिहार यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास बारोड पोलीस करत आहेत.

२०२१ मध्ये सुरू केले होते यूट्यूब चॅनेल

छवीने २०२१ मध्ये स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. त्या दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित व्लॉग्स तसेच ऑनलाइन गेमिंगचे व्हिडिओ पोस्ट करत होत्या. तिच्या कंटेंटला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि काही वर्षांतच त्यांनी यूट्यूबवर ७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठला. याशिवाय इंस्टाग्रामवरही त्यांचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. छवीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. छवी आणि त्यांच्या आईचे पार्थिव आज हाथरस येथील महाउखास गावात आणले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT