Bollywood Actor Cheated on Wife After 20 Years of Marriage Saam
मनोरंजन बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्याचा कारनामा; विवाहित असूनही अनेक अभिनेत्रींसोबत शारिरीक संबंध, डिटेक्टिव्हकडून पोलखोल

Bollywood Actor Cheated on Wife After 20 Years of Marriage: विवाहित बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत विवाहबाह्य संबंध होते, असा दावा तान्या पुरीनं केला आहे.

Bhagyashree Kamble

  • डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं अभिनेत्याबाबत मोठा खुलासा केलाय

  • अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत संबंध होते, असा दावाही तिनं केला

  • तान्या पुरीनं केलेल्या दाव्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ

देशातील सर्वात तरूण खासगी गुप्तहेर तान्या पुरीनं एका सेलिब्रिटीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं एका मुलाखतीत त्या सेलिब्रिटीवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक विवाहबाह्य संबंध होते, असा दावा तानिया पुरीनं एका मुलाखतीतून केला आहे. २० वर्षांच्या लग्नानंचर अभिनेत्याच्या पत्नीला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबाबत माहिती मिळाली. तिनं डिटेक्टिव्हची मदत घेतली, अशी माहिती तानिया पुरीनं मुलाखतीतून दिली.

बॉलिवूड अभिनेता विवाहित असून, तो २ मुलांचा पिता आहे. त्याचे अनेक अभिनेत्रींशी संबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. तान्या पुरीनं दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'मला वाटतं बॉलिवूडमध्ये विवाहबाह्य संबंधाची अनेक प्रकरणे आहेत. पण लोक त्याबद्दल बोलत नाहीत. त्यांना त्यांची प्रतिमा आदर्श म्हणून दाखवायची आहे. एका जोडप्याबद्दल माहिती देईन, २०००साली त्यांचे लग्न झाले होते'.

'त्यांच्या नात्यात पती उघडपणे फसवणूक करीत होता. त्याचे अनेक तरूणींसोबत अफेअर्स होते', असा खुलासा तान्या पुरीनं केला आहे. 'तान्या पुरी यांनी खुलासा केला की, अभिनेत्याच्या पत्नीला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबाबत माहिती होती. त्याची २ मोठी मुले इंडस्ट्रीत आहेत मुलांना वडिलांच्या अफेअर्सबाबत कल्पना होती', अशी माहिती तान्या पूरीनं दिली. अभिनेत्याची पत्नी उच्चशिक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरिटस अफेअरबाबत कशी माहिती मिळाली, याबाबत तानिया पुरीनं माहिती दिली, 'आम्हाला त्यांच्या मॅनेजरकडून या प्रकरणाबाबत माहिती मिळाली. केस हातात घेतल्यानंतर आम्ही अभिनेत्याची चौकशी केली. चौकशीत अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे', असं तान्या पूरी म्हणाली.

याबाबत अभिनेत्याची पत्नी म्हणाली की, 'अभिनेत्यानं लग्नाच्या २० वर्षांनंतर या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. त्या कपलसाठी फिजिकल इंटीमेसी फसवणूक नव्हती. ती त्याला माफ करत राहिली. तिच्यासाठी कदाचित इमोशनल फसवणूक, फिजिकल चीटिंगपेक्षा मोठी असू शकते', अशी माहिती तानिया पुरीनं दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT