Yere Yere Paisa 3  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yere Yere Paisa 3 : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'ये रे ये रे पैसा ३'; जबरदस्त टीझर रिलीज, पाहा VIDEO

Yere Yere Paisa 3 Teaser Release : कॉमेडी मराठी चित्रपट 'ये रे ये रे पैसा ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Shreya Maskar

धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'ये रे ये रे पैसा' आणि 'ये रे ये रे पैसा २' या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर आता या फ्रँचायझीचा तिसरा भाग म्हणजेच 'ये रे ये रे पैसा 3' (Yere Yere Paisa 3 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या 18 जुलै ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'ये रे ये रे पैसा 3' धर्मा प्रॉडक्शन्स आणि एव्हीके पिक्चर्सच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. पुन्हा एकदा अण्णा, आदित्य, बबली आणि सनी एकत्र आल्याने हास्याचा मोठा धमाका उडणार आहे. 'ये रे ये रे पैसा ३' मध्ये पाच करोडचा घोळ आणि त्यात आलेले नवीन ट्विस्ट काय असतील, हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात की," 'ये रे ये रे पैसा ३' हा चित्रपट माझ्यासाठी केवळ एक सिक्वेल नाही, तर प्रेक्षकांचे प्रेम आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे चित्रपटाचा तिसरा भागही त्याच तोडीचा असावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. 'ये रे ये रे पैसा ३' हा चित्रपटही प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल, याची मला खात्री आहे. हा धमाकेदार चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत तयार राहावे."

'ये रे ये रे पैसा ३'मध्ये खूप तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT