lataa saberwal sanjeev seth marriage sepration  Saam tv
मनोरंजन बातम्या

Celebrity Couple Divorce : ये रिश्ता क्या कहलाता है! आणखी एका सेलिब्रिटी कपलचा घटस्फोट? लग्नाच्या १५ वर्षांनंतर संसार मोडला

lataa saberwal sanjeev seth marriage sepration : आणखी एका सेलिब्रिटी कपल वेगळं झालं आहे. लग्नाच्या १५ वर्षांनंतर दोघांचा संसार मोडला.

Vishal Gangurde

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री लता सभरवाल आणि अभिनेत्री संजीव सेठ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. लता आणि संजीव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. लता आणि संजीव यांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र, आता हे कपल वेगळं झालं आहे.

लता सभरवाल यांनी इन्स्ट्राग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लता यांनी नवरा संजीवपासून वेगळं होत असल्याची माहिती दिली. लता यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'मी पती संजीव सेठ यांच्यापासून वेगळी झाली आहे. मला प्रेमळ मुलगा देण्यासाठी त्यांचे आभार मानते. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की, कृपया माझ्या कुटुंबाच्या शांतीचा सन्मान करावा'.

लता यांनी पुढे म्हटलं की, 'मला कोणतेही प्रश्न विचारू नयेत. धन्यवाद'. पोस्ट शेअर केल्यानंतर लता यांनी कमेंट्स देखील बंद केल्या. दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दोघांचं वेगळं होण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संजीव यांच्यासोबत अधिकृत घटस्फोट झाल्याचंही लता यांनी स्पष्ट केलेलेलं नाही. लता यांनी फक्त पतीपासून वेगळं झाल्याचे जाहीर केलं.

दोघांचा अधिकृत घटस्फोट झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. दोघांच्या घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. लता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पतीपासून वेगळी झाल्याची माहिती दिली. लता आणि संजीव यांनी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षराच्या (हिना खान) पालकांचा भूमिका केली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याचा घटस्फोट झाला. चहल याने धनश्री वर्माला घटस्फोट दिला. याआधी हार्दिक पंड्याने पत्नी नताशा स्टेनतकोविकला घटस्फोट दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT