Yeh Rishta Kya Kehlata Hai Actress Hina Khan Wishes Actress Should Get Off On First Two Days Of Unbearable Periods Pain Saam TV
मनोरंजन बातम्या

Hina Khan Post: मासिक पाळी रजेची पुन्हा जोरदार चर्चा, हिना खानची बेधडक पोस्ट

Yeh Rishta Kya Kehlata Hai Actress Hina Khan Posted On Periods: अभिनेत्रीच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही तिच्या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

टीव्ही अभिनेत्री हिना खानच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. बुधवारी हिनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यात तिने म्हटलं होतं की, अभिनेत्रींसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची सुट्टी असली पाहिजे. अभिनेत्रीच्या ह्या इन्स्टाग्राम पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत असून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही तिच्या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

हिनाने पोस्टमध्ये काय म्हटलं?

हिनाने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले, “मासिक पाळीनंतर दोन दिवस शूटिंग न करण्याचा पर्याय माझ्याकडे असता. मी असेच सांगत नाहीये. तर तुम्ही स्वतः कल्पना करा. ४० डिग्री तापमानात बाहेर शूटिंग करणे तेही तेव्हा, जेव्हा पीरियड्समुळे शरीरात वेदना होत असतात. मूड स्विंग्स होत असतात, डिहायड्रेशन, उष्णतेमुळे येणारी पुरळे, लो बीपी, धावण्याचे सीन शूट करणे, हा मूर्खपणा आहे.” अशी पोस्ट लिहित तिने 'अ‍ॅक्टर्स लाइफ' हॅशटॅगचा वापर केला आहे.

हिनाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तिच्या फॅन्समध्ये मेंस्ट्रुअल लीव्हची मागणी जोर धरत आहे. काही लोक हिनाच्या समर्थनार्थ उभे राहत आहेत, तर काहीजणांनी ती करत असलेल्या मागणीला फालतू समजत आहेत.

मेंस्ट्रुअल लीव्हवर आधीही वादविवाद झाला आहे

ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही 'मेंस्ट्रुअल लिव्ह' या मुद्द्यावर चर्चा झाली होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कामकाजी महिलांना पेड मेंस्ट्रुअल लीव्ह देण्याबाबत असहमती व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा नैसर्गिक भाग आहे आणि याला कोणत्याही प्रकारच्या कमजोरीप्रमाणे पाहू नये. त्यांच्या मते, मासिक पाळी दरम्यान ऑफिसमधून सुट्टी मिळणे महिलांशी भेदभावाचे कारण बनू शकते. हिनाच्या या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर चर्चेचे वादळ उठले आहे. आता पाहायचे की या मागणीला किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT