Toxic Collection: दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' हा यावर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची मोठी चर्चा होती. यशच्या चाहत्यांमध्येही या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरील त्याची कमाई अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चार दिवसात २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असला, तरी वीकेंडच्या कमाई अपेक्षेपेक्षा कमी होती.
‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, ‘टॉक्सिक’ने रविवारी २३ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी चित्रपटाने २५.१५ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे एका दिवसात कमाईत ८.५ टक्क्यांची घट झाली आहे. रविवारी चित्रपटाचे एकूण १६,२४१ शो झाले. पण, सीट ऑक्युपन्सी रेट फक्त २५.३ टक्के होता.
चित्रपटाच्या पाचव्या दिवशी हिंदी व्हर्जनने सर्वाधिक १४.५० कोटी रुपयांची कमाई केली. कन्नड व्हर्जनने ६.४० कोटी, तेलगू व्हर्जनने १.४० कोटी, तमिळ व्हर्जनने ६० लाख, तर मल्याळम व्हर्जनने १० लाख रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे रविवारी चित्रपटाच्या भारतीय बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाईत २३ कोटी रुपयांची कमाई झाली. तसेच, ‘टॉक्सिक’च्या जगभरातील कमाईचा आकडा २८५.२० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परदेशात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, रविवारी परदेशातून सुमारे २ कोटी रुपयांची कमाई झाली.
भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 'टॉक्सिक'ने १०१ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी २७.२० कोटी, चौथ्या दिवशी २५.१५ कोटी आणि पाचव्या दिवशी २३ कोटी रुपये कमावले.
'टॉक्सिक' या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं असून यामध्ये यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.