World Theatre Day 2023  Saam Tv
मनोरंजन बातम्या

World Theatre Day 2023: ‘जागतिक रंगभूमी दिन’ या व्यक्तीमुळे सुरु झाला... जाणून घ्या रंगभूमी दिनाचा संपूर्ण इतिहास एका क्लिकवर

आज जागतिक रंगभूमी दिन आहे. हा आजचा दिवस सिनेसृष्टीत उत्साहात साजरा केला जातो.

Chetan Bodke

World Theatre Day 2023: आज जागतिक रंगभूमी दिन आहे. हा आजचा दिवस सिनेसृष्टीत उत्साहात साजरा केला जातो. आजपासून 62 वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली.

पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. या दिवशी, अनेक देशांमध्ये, रंगभूमी किंवा रंगभूमीशी संबंधित कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करतात.

खरं तर मनोरंजन क्षेत्रात सिनेविश्वाचे वर्चस्व येण्यापूर्वी रंगभूमी हेच प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे साधन होते. त्याचबरोबर चित्रपटांसोबतच रंगभूमीबद्दल जागरुकता आणि आवड निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक रंगभूमी दिनाचे आयोजन केले जाते.

सध्या इंटरनॅशनल थिएटर इंस्टिट्यूटने 1961 साली जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. यासाठी दरवर्षी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये जगभरातून एक थिएटर आर्टिस्ट निवडला जातो, जो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सर्वांसमोर एक खास संदेश देतो. हा संदेश सुमारे 50 भाषांमध्ये अनुवादित करुन जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात येते.

1962 मध्ये सर्वप्रथम फ्रान्सच्या जीन कॉक्टो यांनी जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी आपला संदेश जगासमोर ठेवला होता. भारताबद्दल बोलायचे झाले तर, 2002 मध्ये प्रसिद्ध भारतीय नाट्य कलाकार गिरीश कर्नाड यांना ही संधी मिळाली होती. असे म्हणतात की, जगातील पहिले नाटक पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात अथेन्समध्ये पार पडले होते. अथेन्समधील एक्रोपोलिसवरील डायोनिससच्या थिएटरमध्ये हे नाटक रंगवण्यात आले.

भारतात रंगभूमीची आवड असलेले लोक दरवर्षी देशातील अनेक शहरांमध्ये विविध नाटकांचे आयोजन करतात. त्याचबरोबर समाजातील दुष्कृत्ये बाहेर काढण्यासाठी अनेक शहरांमध्ये नाटकांचे आयोजन केले जाते. आजही अनेक महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थी सामाजिक विषयांवर पथनाट्ये सादर करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT