Ram Charan: अभिषेक बच्चनने नाकारलेलं आव्हान राम चरणने स्वीकारलं.. आणि अमिताभ बच्चन यांचा रिमेक सुपरहिट केला

Ram Charan Movie: राम चरणने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
Ram Charan Birthday
Ram Charan BirthdaySaam Tv

Ram Charan Birthday Special: 'आरआरआर' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण ग्लोबल स्टार बनला आहे. आज राम चरणचा ३८ वा वाढदिवस आहे. राम चरण दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांचा मुलगा आहे. राम चरणने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. परंतु जरी असे असले तरी त्याचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट फ्लॉप ठरला. 2013 मध्ये त्याने जंजीरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट १९७३ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या याच नावाच्या चित्रपटाचा हा रिमेक होता.

हा चित्रपट राम चरणसाठी खास होता कारण त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना रामची ओळख होणार होती. तसेच राम चरण बिग बींनी साकारलेली एक प्रतिष्ठित कलाकृतीमध्ये काम करणार होता.

Ram Charan Birthday
Malayalam Actor: जेष्ठ मल्याळम अभिनेते इनोसेंट यांचे निधन, वयाच्या ७५व्या घेतला अखेरचा श्वास

अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन सुद्धा हे आव्हान स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हा अभिषेकने रामला एकदा विचारले की त्याने आव्हान स्वीकारण्याचा निर्णय का घेतला. रामने 2013 मध्ये हैदराबाद दिलेल्या एका मुलाखतीत टाईम्सला सांगितले, "बॉलिवुडमधील एका 'मोठ्या स्टार'ने अलीकडेच मला सांगितले, 'तुम्हाला माहित आहे का की तुम्ही स्वतःला तुम्ही किती मोठी जबाबदारी घेतली आहे?

जंजीर हा एक चित्रपट आहे जो प्रत्येक भारतीयाच्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये आहे. अमिताभ यांच्या मुलाने याला नकार दिला आहे. त्याला या चित्रपटामध्ये काम करणे खूप प्रेशर असल्यासारखे वाटत आहे. तुम्हाला ते का करायचे आहे?'.

यावर राम म्हणाला, 'सर, मी सांगू इच्छितो की माझा जन्म फक्त प्रेशर हाताळण्यासाठी झाला आहे. माझ्याकडे अनेक लोक येतात आणि सांगतात की मला माझ्या वडिलांचे जागा घ्यावी लगेल.' पण मिस्टर बच्चन यांच्या चित्रपटामुळे माझी स्वतःकडून अपेक्षा आणखी वाढल्या!"

राम सध्या त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, या चित्रपटाचे नाव तूर्तास RC 15 ठेवले आहे. शंकर या चित्रपटाचे दिग्दर्शिन करत आहेत. कियारा अडवाणीच्या मुख्य भूमिकेत असणार आहे. तेलुगू अॅक्शन चित्रपटात शंकर आणि राम पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com