Surabhi Jayashree Jagdish
पैठणी साडी म्हटलं की तिचा रंग, सोन्याची जरी आणि पारंपरिक काठ असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यामुळे अशा साडीवर ब्लाऊज निवडताना कॉन्ट्रास्ट, डिझाईन आणि कापड यांचा नीट विचार महिलांन करावा लागतो.
योग्य ब्लाऊज डिझाईनमुळे पैठणीचा रुबाब आणखी खुलतो आणि संपूर्ण लूक राजेशाही दिसू लागतो. पैठणीसाडीवर कोणत्या डिझाईनचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज उठून दिसू शकतात ते पाहूयात.
पैठणी ज्या रंगात आहे त्याच्या अगदी उलट रंगाचा प्लेन सिल्क ब्लाऊज फार उठून दिसतो. जसं की, हिरव्या पैठणीवर लाल, जांभळ्या पैठणीवर मोरपंखी रंग असे उठून दिसतात.
सोन्या-चांदीच्या जरीचा ब्रोकॅड ब्लाऊज पैठणीच्या काठाशी सुंदर जुळतो. हा ब्लाऊज साडीच्या पारंपरिक लूकमध्ये भर घालतो. लग्नसमारंभ किंवा सणासाठी हा पर्याय खूप लोकप्रिय आहे.
पैठणीवरील मोर, फुलं किंवा अशीच बुटी असलेला ब्लाऊज छान उठून दिसतो. मोठ्या डिझाइनऐवजी लहान बुटी अधिक एलिगंट दिसते. हा लूक पारंपरिक आणि हलकाही वाटतो.
साध्या डार्क रंगात हाय नेक ब्लाऊज पैठणीला मॉडर्न टच देतो. ही डिझाईन मानेला वेगळा लूक देते. पारंपरिक साडीत थोडा फ्युजन लूक हवा असेल तर योग्य पर्याय.
मरून, बॉटल ग्रीन किंवा नेव्ही ब्लू वेल्वेट ब्लाऊज पैठणीवर राजेशाही दिसतो. हिवाळ्यात किंवा रात्रीच्या कार्यक्रमांसाठी हा ब्लाऊज फारच शोभतो.
ब्लाऊजचा मुख्य भाग एक रंगाचा आणि स्लीव्हज दुसऱ्या कॉन्ट्रास्ट रंगात असलेलं डिझाईन आकर्षक दिसतं. स्लीव्हवर जरी, पट्टी किंवा बुटी असतील तर लूक अधिक खुलतो.