Salim Khan Threat News Saam TV
मनोरंजन बातम्या

Salim Khan Threat News : सलमान खानच्या वडिलांना महिलेकडून धमकी; म्हणाली, लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?

Salman Khan Father Threat : सलमान खानचे वडील सलिम खान यांना एका महिलेकडून धमकी देण्यात आली आहे. महिलेने थेट लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत सलमानच्या वडिलांना धमकावलं आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, अशा शब्दांत एका अज्ञात बुरखाधारी महिलेने सलीम खान यांना धमकावलंय. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी बँडस्टँड परिसरात सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी स्कुटीवरून एक बुरखाधारी महिला त्यांच्या जवळ आली आणि तिने ही धमकी दिली. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला देखील धमकी देण्यात आली होती.

वांद्रे पोलिसांकडून महिलेला अटक

निर्माते सलीम खान धमकी प्रकरणातील दोन्ही आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोई को भेजु क्या असे म्हणत काल सकाळी ही दुचाकीवरील ही जोडी वांद्रे परिसरातून फरार झाली होती. मात्र वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत सकाळी बाईक चालकाला अटक केली होती. यानंतर आता धमकी देणाऱ्या महिलेला देखील अटक केली आहे.

गोळीबार प्रकरणी मोठा ट्विस्ट

१४ एप्रिल रोजी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी हरपाल सिंह पोलिसांच्या ताब्यात आहे. अशात आता या आरोपीने कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

तळोजा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोपी हरपाल सिंहने केला आहे. आठ महिन्यांपूर्वी बोटाला फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात पाठवण्याची विनंती केल्यानंतर आरोपीकजे १०,००० रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्याने यावेळी केला आहे. न्यायाधीशांनी सीएमओला आरोपांसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोपी हरपाल सिंहला आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, गोळीबार प्रकरणी या आधी अनुज थापन या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्याने स्वत: फाशी घेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT