Natu- Natu Song
Natu- Natu Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

‘Natu- Natu’ला ऑस्कर मिळाला पण...; कारण सांगत संगीतकाराने मागितली नेटकऱ्यांची माफी

Chetan Bodke

Natu- Natu Song: ऑस्कर पुरस्कारामध्ये यंदा भारताने दोन पुरस्कारांमध्ये बाजी मारली. ‘नाटू- नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाल्याने भारतीय चित्रपट विश्वाच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ‘RRR’ आणि ऑस्कर हा विषय प्रचंड चर्चेत आहे. पण एक विचित्र गोष्ट घडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘नाटू- नाटू’ गाण्याचा गायक कालभैरवने मात्र प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

‘RRR’ चित्रपटाच्या ‘नाटू- नाटू’ गाण्याला आवाज देणारा गायक काल भैरवने सोशल मीडियावर माफी मागितली आहे. वास्तविक, कालभैरवने गुरुवारी ट्विटरवर एक लांब पोस्ट शेअर केली. ही पोस्ट वाचून सोशल मीडिया यूजर्स संतापले. त्यांनी गायकाला त्याच्या पोस्टवर कमेंट करून ट्रोल करण्यास सुरुवात केली, त्यानंतर काल भैरवने शुक्रवारी आणखी एक पोस्ट शेअर करून माफी मागितली. नेमकं त्या मागील कारण काय, ती पोस्ट नेमकी काय आहे. चला तर जाणून घेऊया.

‘RRR’ मधल्या ‘नाटू- नाटू’ला ऑस्कर मिळाल्यावर कालभैरवने एक पोस्ट शेयर केली होती. त्यात लिहिले होते की, “मला तुम्हा सर्वांसोबत काहीतरी शेअर करायचे आहे. ‘RRR’ चे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी परफॉर्म करण्याची अमूल्य संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्या नोटवर, मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काही लोकांमुळेच, ही अमूल्य संधी मला मिळाली. त्यामुळे मी खुप आनंदी आहे.”

अशी पोस्ट लिहून कालभैरवने दिग्दर्शक, संगीतकार अशा सर्वांचे आभार मानले. पण कालभैरवने RRR मधील प्रमुख अभिनेते Jr. NTR आणि Ram Charan यांचा उल्लेख कालभैरवने केला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी कालभैरव यांच्यावर टीका केली. त्यामुळे कालभैरवला त्याची चूक लक्षात आली, असून त्याने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली.

काल मागितलेल्या माफीत कालभैरव म्हणतो, “तारक अण्णा आणि चरण अण्णा हे ‘नाटू- नाटू’ आणि ‘RRR’ च्या यशाचे मुख्य कारण आहेत यात शंका नाही. पण ऑस्कर अवॉर्ड्सच्या स्टेज परफॉर्मन्ससाठी मला संधी मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली याबद्दल मी फक्त बोलत होतो. अजून काही नाही. मी पाहतो की ते चुकीचे व्यक्त केले गेले आहे आणि त्याबद्दल, मी माझ्या शब्दांच्या निवडीबद्दल मनापासून माफी मागतो.”

नुकताच झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात संगीतकार एमएम कीरावानी यांनी ‘नाटू- नाटू’ गाण्याचं सादरीकरण केलं. चित्रपटातील कलाकारांना यावर डान्स करता आला नसून परदेशी कलाकारांनी ‘नाटू- नाटू’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. ‘नाटू- नाटू’ डान्स जेव्हा संपला तेव्हा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाटात गाण्याचे कौतुक केले. सोबतच महत्वाची बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने ऑस्कर २०२३ मध्ये प्रेझेंटरची भूमिका सादर केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Care: उन्हाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी अशी घ्या काळजी

Devendra Fadnavis in Madha: माढ्याला ठोकशाही अन् दहशतीतून मुक्त करणार; देवेंद्र फडणवीस मोहिते-पाटलांवर कडाडले

Nashik News Today: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड! भुजबळ फार्मवर नेमकं काय घडतंय?

Today's Marathi News Live : नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारी सुरू

Mayank Yadav Comeback: सामन्याआधीच मुंबईचं टेन्शन वाढलं! लखनऊचा सर्वात खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक

SCROLL FOR NEXT