Rajinikanth: वानखेडेवर कोहली - शर्मा पेक्षा रंगली थलायवाची चर्चा; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात रजनीकांतच्या उपस्थितीने लावले चार चांद
Actor Rajinikanth In Wankhede: मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना झाला. हा सामना भारताने जिंकला आहे. भारताने जिंकलेल्या या सामन्यात चर्चा मात्र सुपरस्टार रजनीकांत याची होती. मुंबईतील भारत-ऑस्ट्रेलियाच्या या सामन्याला एमसीएने रजनीकांत सामन्यासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते.
सामन्यादरम्यान रजनीकांत यांना अनेकदा मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आले. त्यांना पाहून चाहत्यांच्या उत्साह आणखी वाढला. रजनीकांत यांनी पाहिल्यानंतर प्रेक्षक जोरजोरात ओरडू लागले. रजनीकांतसोबत यावेळी एमसीएचे खजिनदार आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
सामन्यानंतर रंजनीकांत यांनी भारतीय क्रिटेत संघाच्या खेळाडूंचीही भेट घेतली. रजनीकांत आणि भारतीय क्रिकेट खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांढऱ्या पोशाखातील रजनीकांतच्या समोर भारतीय संघातील खेळाडू दिसत आहेत.
कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर आणि भारतीय संघाचा सपोर्ट यांनी रजनीकांत यांची भेट घेतली आणि गप्प देखील मारल्या. रजनीकांत यांनी या एक दिवसीय घेतला तसेच त्यानंतर ते या खेळाडूंना भेटले.
रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट २०२३ यावरही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रजनीकांत दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अन्नत्थेमध्ये रजनीकांत शेवटचे दिसले होते.
चित्रपट रसिकांसाठी ही दुहेरी भेट असेल कारण 'जेलर'मध्ये रजनीकांत त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच दिग्गज भारतीय अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.