karan kundrra Saam Tv
मनोरंजन बातम्या

करण कुंद्रा करणार तेजस्वी प्रकाशसोबत लग्न? जाणून घ्या लग्नपत्रिकेचे सत्य

सोशल मीडियावर करण कुंद्राचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - टीव्ही अभिनेता करण कुंद्राने सोशल मीडियावर (Social Media) सेव्ह द डेट नावाचा टीझर शेअर केला आहे. त्यानंतर त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. करण कुंद्राने (Karan Kundra) काल रात्री इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करणने एक लग्न पत्रिका शेअर केली आहे. ही पत्रिका पाहून लोकांना असे वाटू लागले आहे की करण आणि तेजस्वी प्रकाश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण हा व्हिडिओ करण-तेजस्वीच्या लग्नाशी संबंधित नाही. येत्या काही दिवसांत करण कुंद्रा एका नवीन म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत बिग बॉस (Big Boss)15 फेम अकासा सिंह दिसणार आहे.

हे देखील पहा -

सोशल मीडियावर करण कुंद्राचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बिग बॉस 15 पासून, #Tejran चे चाहते अपेक्षा करत आहेत की दोघेही लवकरच लग्नाशी संबंधित काही चांगली बातमी शेअर करतील. हेच कारण आहे की समोर आलेल्या व्हिडिओचे सत्य जाणून न घेता तेजरानच्या चाहत्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT