Yo Yo Honey Singh Saam Tv news
मनोरंजन बातम्या

यो यो हनी सिंग नागपुरात? 'ते' प्रकरण भोवलं!

हनीसिंगला आपल्या आवाजाचे नमुने देण्यासाठी आज नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मंगेश मोहिते

नागपूर - अश्लील नृत्य आणि गीते सादर केल्या प्रकरणी नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये रॅप गायक यो यो हनीसिंग (Honey Singh) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी हनीसिंगला सत्र न्यायालयाने (Sessions Court) दणका दिला आहे. हनीसिंगला आपल्या आवाजाचे नमुने देण्यासाठी आज नागपुरातील (Nagpur) पाचपावली पोलीस (Police) ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हे देखील पहा -

याआधी देखील 27 जानेवारी रोजी न्यायालयाने हनीसिंगला आपल्या आवाजाचे नमुने देण्याकरिता 4 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिले होते. पण त्या आदेशाचे हनीसिंगने पालन केले नाही. 10 फेब्रुवारी रोजी, सिंग यांनी पुढील तपासासाठी आवाजाचे नमुने प्रदान करणे आवश्यक असलेल्या आदेशात बदल करण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावला.

त्यानंतर आज पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचा आदेश दिले आहे. त्यामुळे आज हनी सिंग आवाजाचे नमुने देण्यासाठी हजर राहणार का याकडे लक्ष लागले आहे. सिंग यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 293 (अश्लीलता) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 67A अंतर्गत इंटरनेटवर अश्लील गाणी गाणे आणि अपलोड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Garje Death Case:...म्हणून मी पोलिसांना फोन केला नाही; गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, टीझरमधील सीन बघून आश्चर्यचकित व्हाल, व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma : टी २० वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी, जय शहांची घोषणा

ICC कडून टी20 विश्वचषकाचे शेड्युल जाहीर; भारत-पाकिस्तानचा पहिला सामना कधी?

Wednesday Horoscope: चहूबाजूंनी होईल पैशाचा वर्षाव, 5 राशीं होणार मालामाल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT