Why the trend of boycotting Brahmastra? What's the matter? Saam Tv
मनोरंजन बातम्या

#BoycottBrahmastra का होतोय ट्रेंड? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा

'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रीलीज झाल्यानंतर अचानक ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड होत आहे. हा ट्रेंड कशामुळं सुरू झाला, याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल. त्या ट्रेलरमध्ये असं काय बघितलं की, लोकांचा इतका संताप झाला?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून काही महिने आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे, मात्र ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर #BoycottBrahmastra आता ट्विटरवर ट्रेंड करत आहे. काय आहे नक्की हे प्रकरण? जाणून घेऊयात...

'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रीलीज झाल्यानंतर अचानक ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड होत आहे. हा ट्रेंड कशामुळं सुरू झाला, याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल. त्या ट्रेलरमध्ये असं काय बघितलं की, लोकांचा इतका संताप झाला? या प्रश्नाची अनेक उत्तरे तुम्हाला नेटकऱ्यांच्या कमेंटमधूनच मिळू शकतील.

चित्रपटातील काही सीन हे हॉलिवूडच्या चित्रपटांतून कॉपी केलेले आहेत, असं काहींचं म्हणणं आहे. लोकांनी चित्रपटाचा ट्रेलर तर पाहिला, त्यात एक सीन छोटासाच होता, पण त्यातील एक गोष्ट लोकांना खटकली. मंदिराच्या आतमध्ये रणबीर कपूर चपला घालून प्रवेश करताना या सीनमध्ये दिसतोय. त्यामुळेच लोकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर #BoycottBrahmastra ट्विटरवर हा ट्रेंड सुरू झाला, असे नेटकऱ्यांच्या कमेंटवरून दिसतंय.

ट्रेलरमध्ये हा सीन बघितल्यापासून ट्वीटरवर अनेक नेटकरी ट्वीट करून आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. 'हा मंदिरात शूज घालून का प्रवेश करत आहे?,' असा सवाल एकानं विचारला. 'मंदिरात चप्पल घालून प्रवेश करायची काही गरज नव्हती. बॉलिवूड सनातन धर्माचा अपमान करणे कधी थांबवेल?' असा सवाल एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.

आयन मुखर्जीने दिग्दर्शन केलेला 'ब्रह्मास्त्र' हा मल्टिस्टारर असलेला चित्रपट आहे. यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर , अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार महत्वाची भूमिका साकारात आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरने शिवा हे पात्र साकारलं असून आलिया भट्ट ईशा नावाचे पात्र साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: या स्पर्धकाला बिग बॉसने दिली सुपर पॉवर; आता घरातील सदस्यांना करणार नॉमिनेट

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

Gold Rate Today : पुन्हा सोन्याचे दर घसरले, अचानक इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा ढोबळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT