Jhund vs Kashmir Files: Kashmir files tax free then why not jhund producer questions the Govt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhund vs Kashmir Files: "...तर मग 'झुंड'ला सरकार एवढी मदत का करत नाही?" - झुंडच्या निर्मात्यांचा सरकारला सवाल...

Savita Raj Hiremath Facebook Post About Jhund: ‘द कश्मीर फाईल्स’ करमुक्त केला आहे तर आमचा चित्रपट देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

श्रेयस सावंत

मुंबई: काश्मिरी पंडिताच्या नरसंहारावर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. इतकेच नाही तर अनेक राज्यात या चित्रपटाला करमुक्त करण्यात आले आहे. जेणे करून अधिकाधिक लोक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचतील. मात्र ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री (Tax Free) करण्यावर आता ‘झुंड’ (Jhund) चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ (Savita Raj Hiremath) यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ‘द कश्मीर फाईल्स’ करमुक्त केला आहे तर आमचा चित्रपट देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ("... then why doesn't the government help the Jhund Movie?" - Movie makers questions to the government ...)

हे देखील पहा -

सविता यांनी शुक्रवारी एक फेसबुक पोस्ट (Facebook Post) लिहिली, ज्यात त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "द काश्मिर फाईल्स जर महत्त्वाचा असेल तर ‘झुंड’ हा चित्रपट कमी महत्त्वाचा आहे का? हा पण विषय तेवढाच महत्वाचा आहे, मग झुंडला सरकार एवढी मदत का करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच झुंड हा चित्रपट केवळ जात आणि आर्थिक विषमतेबद्दल बोलत नाही तर समाजातील मागासलेल्या लोकांना त्यांची यशोगाथा शोधण्याचा मार्ग देखील दाखवते असं त्या म्हणाल्या.

झुंड (Jhund):

झुंड हा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. झी स्टुडिओ या प्लॅटफॉर्म अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले असून यामध्ये अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांसह नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात वंचित समाजातील तरुणांचा संघर्ष यावर भाष्य करण्यात आलयं.

द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files):

द काश्मीर फाइल्स विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, झी स्टुडिओज निर्मित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात जम्मू आणि काश्मीरमधील उग्रवादादरम्यान पीडित काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे चित्रण दाखवले गेले आहे. यात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

हे दोन्ही चित्रपट दोन वेगवेगळ्या विचारधारेकडे झुकतात. मात्र द काश्मीर फाईल्सवरुन भाजप राजकारण करत हा चित्रपट संपल्यानंतर काही भाजप कार्यकर्ते चित्रपटागृहात भाषण देत आहेत आणि एका विशिष्ट समाजाविरोधात भाजप जनतेला भडकवत आहे असा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. तर हा चित्रपट वास्तववादी असल्याचं म्हणत भाजप नेत्यांनी या चित्रपटाला जोरदार समर्थन केल, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाबाबत भाष्य केलं होत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT