HBP dimple kapadia
HBP dimple kapadia Instagram @dimplekapadia_dk
मनोरंजन बातम्या

Dimple Kapadia Birthday: अवघ्या १६ वर्षी प्रसिद्ध झालेल्या डिंपल लग्नानंतर का गेल्या चित्रपटांपासून दूर? हे आहे कारण

Pooja Dange

Dimple Kapadia Relationships: डिंपल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असायची. डिंपलने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 31 वर्षीय राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले आणि हळूहळू ती चित्रपटांपासून दूर जाऊ लागली. आज डिंपल कपाडियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी निगडित काही महत्त्वाच्या पैलूंविषयी जाणून घेऊया, तसेच डिंपल पडद्यापासून दूर गेल्यानंतर आता काय करत आहे ते देखील जाणून घेऊया.

70 आणि 80 च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली डिंपल कपाडिया आज पडद्यापासून दूर असली तरी तिच्या प्रत्येक कामामुळे ती चर्चेत असते. डिंपलला चित्रपटात आणण्याचे श्रेय राज कपूर यांना जाते. डिंपलचे वडील चुन्नीभाई कपाडिया खूप श्रीमंत होते. ते त्यांच्या घरी मोठमोठ्या पार्ट्या देत असत. या पार्ट्यांमध्ये मनोरंजन जगतातील स्टार्सही सहभागी होत असत. (Latest Entertainment News)

एका पार्टीदरम्यान राज कपूर यांची नजर डिंपल कपाडियावर पडली. यानंतर राज कपूर यांनी डिंपलला त्यांचा मुलगा ऋषी कपूरसोबत 'बॉबी' चित्रपटात ब्रेक दिला.

डिंपल कपाडियाच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे तर, राजेश खन्नासोबत तिची पहिली भेट चित्रपटात येण्यापूर्वीच झाली होती. अहमदाबादच्या नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये दोघांची भेट झाली. हिमांशू भाई व्यास यांनी सांगितले होते की, राजेश खन्ना 70 च्या दशकात त्या स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख पाहुणे होते. त्याचवेळी राजेश खन्ना पाहताच क्षणी डिंपलच्या प्रेमात पडले आणि इथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. (Celebrity)

डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनी 1973 मध्ये लग्नगाठ बांधली. राजेश आणि डिंपलच्या वयात १५ वर्षांचे अंतर होते. राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर डिंपल 11 वर्षे पडद्यापासून दूर राहिली, त्याच काळात ट्विंकल आणि रिंकी यांचा जन्म झाला. त्या काळातही डिंपलला चित्रपटात काम करायचे होते, पण राजेश खन्ना यांना डिंपलने चित्रपटामध्ये काम करणे पसंत नव्हते.

दोघांमधील मतभेदांमुळे त्यांच्या नात्यातील अंतर वाढू लागले आणि नऊ वर्षानंतरच डिंपल आणि राजेश खन्ना यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्नांपासून विभक्त झाल्यानंतर डिंपलने 'सागर' चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आणि अनेक उत्कृष्ट चित्रपटांचा भाग बनली.

डिंपल कपाडिया चित्रपटांमध्ये सक्रिय असण्यासोबतच एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. अभिनेत्री होममेड डिझायनर मेणबत्त्यांचा बिजनेस करते. 'फार अवे ट्री' असे तिच्या कंपनीचे नाव आहे. डिंपलच्या कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या मेणबत्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या खास औषधी वनस्पतींपासून बनवल्या जातात.

अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला मेणबत्त्यांची आवड आहे. ती परदेशात जायची तेव्हाही तिथून मेणबत्त्या विकत घ्यायची आणि त्यांचं कलेक्शन करायची. कालांतराने तिने स्वतः मेणबत्त्या बनवायचे ठरवले. यासाठी डिंपलने परदेशात प्रशिक्षणही घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Ratnagiri Crime : काेकणातील श्रमिक सहकारी पतपेढीवर दराेडा, दीड कोटींचे सोने लंपास; श्वान पथक दाखल

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! ऐन निवडणुकीत रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?

IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

Today's Marathi News Live : नाशिकच्या मालेगावात ग्रामस्थांनी केला रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT