Disha Salian google
मनोरंजन बातम्या

Disha Salian: सेलिब्रिटी मॅनेजर अन्...; सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियान नेमकी कोण होती?

Who Was Disha Salian: दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिशा सालियान हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप दिशा सालियानच्या वडिलांनी केला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी सतीश सालियान यांनी केली आहे. मुलीच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दिशा सालियान प्रकरण चर्चेत आले आहे.

दिशाच्या वडीलांची मागणी

दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. तसेच आदित्य ठाकरेंविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. एएनआयच्या एका वृत्तानुसार, या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रभावशाली लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सतीश सालियान यांचे वकील नीलेश सी ओझा यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करू नये आणि कथित गुन्हा दडपण्यासाठी त्यांनी भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांसोबत काम केले असा आरोप सतीश सालियान यांच्या वकिलांनी केला आहे.

कोण होती दिशा सालियान

२८ वर्षीय दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करायची. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत दिशा सालियानने काम केले होते. दिशाच्या मृत्यूच्या केवळ सहा दिवसांनी,अभिनेता सुशांत सिंह राजपूतने कथित आत्महत्या केली होती. वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं होतं, असं सांगण्यात आलं होतं. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दिशाने सुशांत सिंग राजपूतसोबत काम करण्यापूर्वी जज्बा चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता वरुण शर्मासोबतही काम केले होते.

वैयक्तिक जीवन

दिशा सालियान आई-वडिलांसोबत दादर येथील फ्लॅटमध्ये राहत होती. सतीश सालियान हे तिचे वडील आहेत, तर आईचे नाव वासंती सालियान आहे. कोविड-१९ मध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान तिचा प्रियकर रोहन रॉयदेखील त्यांच्यासोबत राहायला आला होता, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT