"A plot is being hatched to assassinate me" - Singer Vaishali Bhaisane life is in danger from whom? Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vaishali Bhaisane: "माझ्या हत्येचा कट रचला जातोय" - सिंगर वैशाली भैसनेच्या जीवाला कुणाकडून धोका?

Singer Vaishali Bhaisane Facebook Post: 'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलयं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'पिंगा गं पोरी... फेम गायक तथा सारेगमप विजेता वैशाली भैसने-माडे (Vaishali Bhaisane - Made) हिने आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) तिने आपल्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तसेच याबद्दल दोन दिवसांंनंतर पत्रकार परिषद घेऊन याबद्दल खुलासा करणार असल्याचंही तिने सांगितलं आहे. ("A plot is being hatched to assassinate me" - Singer Vaishali Bhaisane life is in danger from whom?)

हे देखील पहा -

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वैशाली (Singer) म्हणाली की, "काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे." तिच्या या पोस्टनंतर चाहते तिला धीर देत आहेत. तसेच याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचाही अनेकांनी सल्ला दिलाय.

राष्ट्रवादीत प्रवेश:

3 जुलै २०२१ रोजी वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैशालीचे स्वागत केलं होतं. यावेळी पक्षातील काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला होता. वैशालीला विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद देण्यात आलं आहे.

कारकीर्द:

वैशाली भैसने-माडे ही एक प्लेबॅक सिंगर (Playback Singer) आहे. तिचं माहेरचं आडनाव भैसने आणि सासरचं आडनाव माडे आहे. २४ ऑगस्ट १९८४ रोजी अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिनं पार्श्वगायन केलयं. २००८ साली झालेल्या ’सारेगमप’ (Saregamapa Marathi) या कार्यक्रमात उत्कृष्ट गायिका म्हणून तिने विजेतेपद भूषवलं. हिंदी सारेगमप या शो चीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसेच वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलयं. तसेच तिने 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणं गायले आहे. मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी तसेच भीम गीते गायली आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT