Reliance Jioला झटका! गमावले कोट्यवधी युजर्स; बाकी कंपन्या मात्र जोमात...

ट्रायने जारी केलेल्या नव्या अहवालानुसार रिलायन्स जिओला मोठा झटका बसला आहे. रिलायन्स जिओने डिसेंबर महिन्यात 1.25 कोटींहून अधिक ग्राहक गमावले आहेत.
Reliance Jio Lost Subscribers
Reliance Jio Lost SubscribersSaam Tv

Reliance Jio Lost Subscribers: टेलिकॉम जगतातील सर्वात लोकप्रिय कंपनी Reliance Jio Digital ला सध्या मोठा झटका बसला आहे. TRAI ने जारी केलेल्या नवीन रिपोर्टनुसार Reliance Jio चे कस्टमर्स कोट्यवधीने कमी झाले आहेत. तर जिओच्या या नुकसानीचा फायदा Bharati Airtel आणि BSNL ला झाला आहे. TRAI ने डिसेंबर 2021 चा डेटा जारी केला आहे.

रिपोर्टनुसार, Reliance Jio चे जवळजवळ सव्वा करोड कस्टमर्स गमावले आहेत. परंतु अजून सुद्धा JIO चा मार्केट शेअर सर्वात अधिक म्हणजेच 36 टक्के आहे. Jio नंतर Airtel 30.81 टक्क्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Reliance Jio Lost Subscribers
पुणे: पोस्टात नोकरीच्या आमिषाने 85 युवकांची फसवणूक! 19 लाखांना गंडा, आरोपी मात्र...

TRAI च्या रिपोर्टमध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की, Vi ला सुद्धा नुकसान झाले आहे. Vi ने सुद्धा तब्बल 16 लाख युजर्स गमावले आहेत. डिसेंबर महिन्यात Bharati Airtel ला सर्वात जास्त फायदा झाला आहे. Airtel ने 4.5 लाख नवीन कस्टमर्स मिळवले आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात BSNL ला सुद्धा मोठा फायदा झाला आहे.

Airtel जवळ डिसेंबरमध्ये सर्वात जास्त Active Wireless Customers (VLR subscribers) होते. तर BSNL आणि MTNL चे VLR सब्सक्रायबर्स सर्वात कमी होते. तर Jio यामध्ये 87.64 टक्क्यांनी ऍक्टिव्ह वायरलेस सब्सक्रिप्शनने दुसऱ्या क्रमांकावर होता.

हे देखील पहा-

TelecomTalk च्या एका रिपोर्टनुसार Reliance Jio आपल्या निष्क्रिय ग्राहकांना काढून टाकण्याचे काम करत आहे. या रिपोर्टमध्ये हे पण सांगितलं आहे की, नोव्हेंबरमध्ये झालेल्या प्रीपेड हाईकमुळे कमी उत्पन्न असलेले वापरकर्ते BSNLकडे गेले.

मार्केट शेअरनुसार Airtel ही दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. Airtel चे ऍक्टिव्ह यावरलेस युजर्स 98.01 टक्के आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर 23 टक्के मार्केट शेअर ने Vi ही कंपनी आहे ज्याचे 86.42 टक्के ऍक्टिव्ह वायरलेस सब्सक्रायबर्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com