पुणे: पोस्टात नोकरीच्या आमिषाने 85 युवकांची फसवणूक! 19 लाखांना गंडा, आरोपी मात्र...

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील 85 युवकांना पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 19 लाख 70 हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात भोर पोलिस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखलं करण्यात आलाय.
आरोपी ज्ञानेश्वर वरे
आरोपी ज्ञानेश्वर वरेअश्विनी जाधव केदारी
Published On

अश्विनी जाधव केदारी

पुणे : पुण्यात फसवणूकीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील 85 युवकांना पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 19 लाख 70 हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात भोर पोलिस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखलं करण्यात आलाय. ज्ञानेश्वर वरे असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात निलेश तावरे या युवकाने तक्रार दिलीय आहे. त्यानंतर भोर पोलीसांनी ज्ञानेश्वर वरे विरोधात गुन्हा दाखलं केलाय. (Pune Crime News)

नेमकं काय आहे प्रकरण?

85 युवकांना पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक (Scam) केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात समोर आला आहे. तब्बल 19 लाख 70 हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात भोर पोलिस स्टेशनमध्ये (Bhor Police Station, Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ज्ञानेश्वर वरे
यवतमाळ: शिवभक्तांची छत्रपतीवरील अशीही निष्ठा! घरावर उभारला पूर्णाकृती पुतळा

नोकरी लागल्याचं सांगून विश्वास मिळवला अन्...

मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर वरे याच्या विरोधात निलेश तावरे या युवकाने तक्रार दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर वरे विरोधात भोर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पहिल्यांदा निलेश तावरे याला नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल 2 लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर तुला नोकरी लागली, असे साफ खोटे सांगून त्याचा विश्वास संपदान केला.

हे देखील पहा-

पीडित मित्राच्या मित्रांचीही फसवणूक!

त्यानंतर आरोपीने पीडित युवकाच्या इतर मित्रांनाही नोकरीला लावतो, असे सांगितले आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले असल्याचा आरोप आहे. मात्र काही दिवसांनी धक्कादायक सत्य समोर येताच त्या युवकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आरोपी ज्ञानेश्वर मागील दोन महिन्यांपासून फरार आहे अन् पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान आरोपीने आणखी काही जणांना फसवले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com