यवतमाळ: शिवभक्तांची छत्रपतीवरील अशीही निष्ठा! घरावर उभारला पूर्णाकृती पुतळा

मुजरा करूनच निघतो घराबाहेर...
घरावर उभारला पूर्णाकृती पुतळा
घरावर उभारला पूर्णाकृती पुतळासंजय राठोड
Published On

संजय राठोड

यवतमाळ: राज्यात सध्या चौकाचौकात आणि शहरा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात राजकारण ढवळून निघत आहे. राजकीय नेत्यांना आणि पुतळ्याच्या संदर्भात आंदोलन (Agitation) करणाऱ्यांना चपराक देण्याची धाडस यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी येथील सचिन भोयर यांनी केले आहे. (Yavatmal News In Marathi)

स्वतःच्या घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पाच फूट उंचीचा पुतळा बसून रोज नित्यनेमाने सचिन भोयर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा अर्चा करतो. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करणाऱ्यांना शिवभक्त सचिन भोयर यांनी मोठी चपराक दिली आहे.

घरावर उभारला पूर्णाकृती पुतळा
BMC notice to Union minister Narayan Rane: BMC ची नोटीस! नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार

छत्रपती शिवरायांच्या प्रति निष्ठा आदर सर्वांनाच आहे. पण छत्रपती शिवरायांच्या प्रति निष्ठा व श्रद्धा जोपासण्यासाठी आर्णीच्या बालाजी नगरातील एका युवकाने आपल्या घराच्या छतावरच शिवरायांचा पाच फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा स्वखर्चाने उभारला आहे. एवढेच नाही तर तो दररोज न चुकता शिवरायांना नमन व पूजन करूनच घरा बाहेर पडतो. एकीकडे सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्या वरून वाद विवाद निर्माण होत असतात या पार्श्वभूमीवर सचिन भोयर या अल्पभूधारक शेतकरी युवकाचे कार्य प्रेरणादायी व अभिनंदनीय असे आहे. सचिन भोयर या तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Yavatmal News)

घर प्रत्येकांचे स्वप्न असते. परंतू,घरासह आपला आदर्श जपता यावा, असे स्वप्न सचिन भोयर यांनी बघितले आणि महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्वतःच्या घरा उभारून त्यांनी बघितलेले स्वप्न साक्षत साकारले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांना सचिन दैवत मानतो. आपल्या दैवत प्रती असलेली श्रद्धा व आदर्श व्यक्त करण्यासाठी त्यांनी ता. ३० एप्रिल २०१५ रोजी घरावरच शिवरायांचा पुतळा उभारला. जिल्ह्यात घरावर छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेला एकमेव घर असावा.

हे देखील पहा-

सध्याच्या घडीला राज्यात (Maharashtra) महाराजांच्या पुतळा बसविण्यावरून मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसते. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्या नंतर त्या पुतळ्याची दररोज साफ सफाई होते का? असा सवाल अल्पभूधारक शेतकरी आणि शिवभक्त सचिन भोयर यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे शिवभक्त सचिन भोयर हे ३६५ दिवस शिवजयंती साजरी करतात.त्यामुळे परिसरातील नागरिक आणि युवकांकडून सचिन भोयर ह्याचे कौतुक तर होत आहेच पण या शिवभक्तांने समाजापुढे नवा आदर्श ठेवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com