मुंबई: एकीकडे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये चांगलेच राजकीय (Political) संघर्ष सुरु आहे. रोज काहींना काही आरोप (Allegations) प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता मुंबई (Mumbai) महापालिकेने (Municipal Corporation) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना त्यांच्या बंगल्यामधील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस (Notice) पाठविण्यात आली होती.
हे देखील पहा-
काय आहे प्रकरण-
मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना त्यांच्या बंगल्यामधील बांधकामाविषयी नोटीस पाठवली आहे. राणेंच्या मुंबई मधील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याची तपासणी करण्याकरिता महापालिकेने नोटीस पाठवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे वाद रंगण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभाग पथकाने आज नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीविषयी तपासणी करणार आहे, अशी नोटीस राणे यांना पाठवली आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याविषयी तक्रार दाखल केली आहे. बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची याअगोदर तक्रार करून देखील महापालिकेने कारवाई केली नसल्याचे दौंडकर यांनी महापालिकेला कळवले आहे. यानंतर महापालिकेकडून ही नोटीस पाठविण्यात आली आहे. बंगल्याचे बांधकाम करत असताना सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.