औरंगाबाद : 10वी व 12वी च्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेअगोदर सर्व विद्यार्थ्यांचे (students) लसीकरण होणे शक्य नाही. यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाची (Vaccination) सक्ती नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षेअगोदर विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) करण्याविषयी पालक, विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देऊन त्याचे नियोजन करावे लागणार आहे. पालकांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) करावे, असे शिक्षण संचालनालयाने यावेळी सांगितले आहे. (Vaccination not compulsory SSC and HSC exams)
हे देखील पहा-
पुढील महिन्यापासून SSC- HSC बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. यामुळे इतक्या कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे अशक्य आहे. एका केंद्रावर दररोज ३०० ते ४०० डोस उपलब्ध होत आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून (Health Department) देखील विद्यार्थी लसीकरणाकरिता डोस उपलब्ध होत नाही. यामुळे केवळ ३० दिवसांत जिल्ह्यात संपूर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण शक्य होणार नसल्याचे शिक्षकांचे (teachers) म्हणणे आहे. तसेच काही पालक देखील आपल्या मुलाला कोरोना लस देण्याकरिता समती देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना देखील SSC, HSC ची परीक्षा देता येणार आहे.
तसेच परीक्षेकरिता लसीकरणाची सक्ती असा कोणताही आदेश दिला नसल्याचे महाराष्ट्र राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. जास्तीत- जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण व्हावे, याकरिता शहरासह ग्रामीण भागामध्ये दौरे केले आहेत. परंतु, सध्या लसीचा तुटवडा असल्याने पूर्णपणे विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही. याविषयी लवकरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांकरिता कोरोना लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. लस घेतली नाही, म्हणून कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. विद्यार्थी, पालकांची जनजागृती केल्यानंतर त्यांच्या संमतीनेच लसीकरण करण्यात येणार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.