Kunal Kamra Eknath Shinde Controversy: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. राजकीय टीका करताना यावेळी कुणालने थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच नाव न घेता टिपणी केली आहे. त्यामुळे राज्यातील एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी त्याचा शो जिथे झाला त्या स्टुडिओची तोडफोड केली. राजकीय टीककेमुळे कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला असून तोडफोड करणाऱ्या ११ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हा कुणाल कामरा नक्की कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कुणालचा जन्म ३ ऑक्टोबर १९८८ साली झाला. तो एक स्टॅण्डअप कॉमेडियन आहे.त्याने बॅचलर आयुष्य, टीव्हीवरील जाहिराती, मालिका, राजकारण, कॅब ड्रायव्हर यांसारख्या अनेक विषयांवर स्टॅण्डअप कॉमेडी केली आहे. कुणालने दादरच्या जय हिंद कॉलेजमधून कॉमर्ससाठी प्रवेश घेतला होता.परंतु, कॉलेजच्या दुसऱ्या वर्षालाच त्याने कॉलेज सोडलं अन् प्रसून पांडे यांच्या अॅड फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. अॅड फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये कुणाल ११ वर्षे काम करत होता.
२०१३ पासून स्टॅण्डअप कॉमेडीचा प्रवास सुरु
२०१३ साली त्याने स्टॅण्डअप कॉमेडी करायला सुरुवात केली. सुरुवातीला अन्य स्टॅण्डअप कॉमेडियन प्रमाणे त्याने मुंबईच्या कॅनव्हास लाफ क्लबमध्ये शो करण्यास सुरु केले. कालांतराने २०१७ साली युट्यूबवरील त्याच्या एका व्हिडिओमुळे त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आणि तेव्हापासून कुणाल प्रकाशझोतात आला. जुलै २०१७ साली त्याने स्वतःचा शो सुरू केला. 'शट अप या कुणाल' या शोमध्ये तो अनेक राजकारणी लोकांच्या मुलाखती घेऊ लागला.
नुकत्याच एका कॉमेडी शोमध्ये कुणालने 'आक्षेपार्ह' असे गाणे एकनाथ सिंदे यांच्यावर सादर केले. तसेच त्यांचा गद्दार म्हणून ओळख केला त्यानंतर या वादाची सुरुवात झाली. सोमवारी पहाटे कुणाल कामरा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या विविध कारवाईअंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला, यामध्ये ३५३(१)(ब) (सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान) आणि ३५६(२) (बदनामी) यांचा समावेश आहे, असे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.