Munawar Faruqui And Mahjabeen Kotwala 2nd Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Who Is Munawar Faruqui 2nd Wife : घटस्फोटित मुनव्वर फारुकीची कोण आहे दुसरी पत्नी, काय काम करते?

Munawar Faruqui And Mahjabeen Kotwala 2nd Wedding : मुनव्वरने मेहजबीन कोटवाला नावाच्या मुलीसोबत निकाह केलेला आहे. मुनव्वरची होणारी दुसरी बायको कोण आहे ? जाणून घेऊया...

Chetan Bodke

‘बिग बॉस १७’ विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या त्याच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने १०-१२ दिवसांपूर्वी गुपचूप निकाह केला आहे. मुनव्वरच्या दुसऱ्या निकाहला नातेवाईक आणि मित्र असे मोजकेच लोक उपस्थित होते. मुनव्वरने मेहजबीन कोटवाला नावाच्या मुलीसोबत निकाह केलेला आहे. मुनव्वरची होणारी दुसरी बायको कोण आहे ? जाणून घेऊया...

मेहजबीन कोटवाला ही यापूर्वी इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह नव्हती. निकाह केल्यानंतर ती सोशल मीडियावर सक्रिय झालेली आहे. तिने इन्स्टाग्रामवर डेब्यू केलेलं आहे. मुनव्वरच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वर आणि मेहजबीनने २६ मे रोजी मुंबईतल्या आयटीसी मराठा हॉटेलमध्ये रिसेप्शन केले आहे. मेहजबीन कोतवाला पेशाने मेकअप आर्टिस्ट आहे. मुनव्वरने लग्नाचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. कारण त्याला त्याचे दुसरं लग्न गुप्त ठेवायचे आहे.

मुनव्वर फारुकीच्या लग्नामध्ये त्याची बेस्ट फ्रेंड आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान सुद्धा लग्नाला उपस्थित होती. हिना आणि मुनव्वर दोघेही खूप चांगले मित्र आहेत. नुकताच त्यांचा एक म्युझिक अल्बम व्हिडीओही रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिनाने मुनव्वरच्या लग्नाला हजेरी लावली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मेहजबीन पेशाने मेकअप आर्टिस्ट असून तिचं व्यावसायिक अकाऊंट इन्स्टाग्रामवर आहे. पण तिचं खासगी अकाऊंट इन्स्टाग्रामवर नव्हतं. पण मीडिया रिपोर्टनुसार, तिने निकाहनंतर इन्स्टाग्रामवर डेब्यू केलं आहे.

मुनव्वर फारुकीचे पहिले लग्न २०१७ मध्ये जॅस्मिनसोबत झाले होते. पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मुनव्वरला त्याच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे. त्याचा संभाळ स्वत: मुनव्वर करतो. मेहजबीनचं ही हे दुसरं लग्न आहे. तिला ही १० वर्षांची मुलगी असून तिचा सांभाळ करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT