Actress Karishma Sharma Mumbai Local Accident Saam tv
मनोरंजन बातम्या

Karishma Sharma: धावत्या लोकलमधून उडी मारणारी अभिनेत्री कोण? का उचलले असं पाऊल, वाचा सविस्तर

Actress Karishma Sharma Mumbai Local Accident: मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अभिनेत्री करिश्मा शर्मा जखमी झाली आहे. ‘रागिनी एमएमएस : रिटर्न्स’ मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली करिश्मा बुधवारी मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होती.

Shruti Vilas Kadam

Actress Karishma Sharma Mumbai Local Accident:  मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अभिनेत्री करिश्मा शर्मा जखमी झाली आहे. ‘रागिनी एमएमएस : रिटर्न्स’ मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली करिश्मा बुधवारी मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होती. मित्र ट्रेनमध्ये चढू न शकल्याने ती घाबरली आणि तिने घाईत चालत्या ट्रेनमधून उडी मारली. क्षणिक भीतीमुळे घेतलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे करिश्माला गंभीर दुखापत झाली. उडी घेताना तिच्या पाठीला आणि डोक्याला जबरदस्त मार लागला, तसेच शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत.

करिश्माला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीची तपासणी करून MRI केली आहे. डोक्यावरील दुखापतीमुळे तिला काही काळ रुग्णालयात ठेवण्यात येईल. तिच्या तब्येतीविषयी ऐकून चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. स्वतः करिश्माने सोशल मीडियावरून घडलेला प्रकार सांगितला. तिने लिहिले – “मी खूप वेदनेत आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी व इंडस्ट्रीतील मित्रमंडळी ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

करिश्मा शर्मा ही २२ डिसेंबर १९९३ रोजी मुंबईत जन्मली. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात केली आणि नंतर चित्रपट व वेब सीरिजच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. ‘रागिनी एमएमएस : रिटर्न्स’ मधील धाडसी व ठसठशीत भूमिकेमुळे तीला ओळख मिळाली. त्याशिवाय तिने ‘प्यार का पंचनामा २’ या सुपरहिट चित्रपटात टीना ही भूमिका केली होती, तर ‘उजडा चमन’ या चित्रपटातही तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि ग्लॅमरस लूकमुळे ती कायम चर्चेत राहिली आहे.

करिश्माच्या या अपघातामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ती पुन्हा नव्या जोमाने प्रेक्षकांसमोर यावी, अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतूनही व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीडितांना घरे द्याच, अन्यथा भाडे द्या; शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर भाजप नेत्याचा संताप

राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत, शिंदेंसोबत युती, 'लवचिक' झाली नाती

ZP निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव ? नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश?

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

SCROLL FOR NEXT