Varun Dhawan and Kiara Advani Image
Varun Dhawan and Kiara Advani Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

वरुण-कियारा जोडीला मेट्रोत वडापाव खाणं पडलं महागात; जाणून घ्या प्रकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'जुग जुग जियो' (Jug Jug Jeeyo)हा चित्रपट (movie) प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. या चित्रपटाचे कलाकार (actor) आणि निर्माते चित्रपटचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी(Kiara Advani), अनिल कपूर, मनीष पॉल आणि नीतू सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अलीकडेच, वरुण धवन आणि कियारा अडवाणी या चित्रपटाचे मुख्य कलाकार मुंबई मेट्रोने प्रवास करताना दिसले. ट्रॅफिक टाळण्यासाठी दोघांनीही मेट्रोने प्रवास केला होता . त्याचबरोबर दोघेही मेट्रोमध्ये वडापाव खाताना दिसले. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण याच व्हिडीओमुळे वरुण आणि कियारा यांना नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

मेट्रोमध्ये काहीही न खाण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांना नेटकऱ्यांनी टीका केली आहे. मेट्रो अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. जर तुम्ही कधी मेट्रोमध्ये प्रवास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की, मेट्रोमध्ये काहीही खाण्यास सक्त मनाई आहे. मात्र, वरुण आणि कियारा यांना या नियमाची माहिती नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच हे दोन्ही कलाकार मोठ्या आनंदाने वडापाव खाताना दिसत आहेत.

या दोघांचा मेट्रोमध्ये वडापाव खातानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकाने त्यांच्या विरोधात लिहिले की, मेट्रोमध्ये काहीही खल्लेले चालत नाही हे तुम्हाला माहिती नाही का? दुसऱ्याने लिहिलं की, मेट्रोमध्ये काहीही खाण्यास परवानगी नाही आहे यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यांना देखील नियमानुसार शिक्षा झालीच पाहिजे.

लवकरच होणार त्यांच्या आगामी चित्रपट प्रदर्शित

जुग जुग जियो या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहताने केले असून हा चित्रपट २४ जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाआहे. या ट्रेलरनुसार हा चित्रपट कौटुंबिक कथेवरआधारित आहे असे दिसून येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

SCROLL FOR NEXT