Kiran Mane In Sindhutai Mazi Mai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane In Sindhutai Mazi Mai: ‘पण तिनं हार मानली नाही...’ किरण मानेने सिंधूताईचा प्रवास सांगत केली महत्वाची घोषणा

Kiran Mane News: ‘कलर्स मराठी’वर स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एक नवी मालिका येत आहे. या मालिकेत किरण मानेही प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Chetan Bodke

Kiran Mane In Sindhutai Mazi Mai: टेलिव्हिजन अभिनेता किरण माने चित्रपट, मालिका आणि नाटकाच्या माध्यमातून त्याने सिनेसृष्टीत डेब्यू केलं. ‘बिग बॉस मराठी ४’, ‘मुलगी झाली हो’च्या माध्यमातून त्याने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहे. सध्या किरण माने एका नव्या मालिकेमुळे चर्चेत आले आहे. ‘कलर्स मराठी’वर स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एक नवी मालिका येत आहे. या मालिकेत किरण मानेही प्रमुख भूमिका साकारणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी किरण मानेने सोशल मीडियावर मालिकेविषयी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी त्याने मालिकेत कोणते पात्र स्विकारणार हे त्याने गुलदस्त्यात ठेवले होते. पण आता यावेळी अभिनेत्याने मालिकेतील भूमिकेविषयी स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली आहे. मालिकेत किरण मानेने सिंधुताईंच्या वडिलांचे पात्र साकारले आहे. सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमान साठे असे असून त्यांच्या भूमिकेची सध्या चर्चा होत आहे.

किरण माने पोस्टमध्ये म्हणतो, “आपल्या एखाद्या भुमिकेतनं, आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी खूपच इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय. सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा 'रियल लाईफ हिरो' सिंधूताईंच्या आयुष्यातला 'बाप'माणूस अभिमान साठे! ज्याकाळात मुलांच्या बरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं. पाप मानलं जायचं. त्याकाळात 'माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिनं शिकावं. मोठ्ठं व्हावं. तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नांव कमावेल', हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं !”

आपल्या पोस्टमध्ये पुढे किरण माने म्हणतो, “संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणार्‍या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या... संकटांचा वर्षाव झाला... पण हार मानली नाही त्यानं. “फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर... नामाचा गजर सोडू नये !” या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं !”

तर पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतो, “सिंधुताईंचं आयुष्यही लै लै लै भयाण संघर्षात गेलंय. आईलाही नकोशी असलेली 'चिंधी' ते अनाथांना हवीहवीशी माय 'सिंधूताई', हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाहीये. मालिकाविश्वात खूप वर्षांनी खरंखुरं, तरल, भावस्पर्शी, प्रेरणादायी आयुष्य येतंय... 'कलर्स मराठी'वर, १५ ऑगस्टपासून, संध्याकाळी ७ वाजता 'सिंधुताई माझी माई'... नक्की बघा... आपल्या मुलामुलींना तर आवर्जुन दाखवा...”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT