Poonam Pandey Saam tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey : पूनम पांडेचा मृतदेह कुठे आहे? तिच्या मृत्यूची फक्त अफवा, ती जिंवत; बॉयफ्रेंडचा दावा

Poonam Pandey Latest News in Marathi : पूनमच्या सोशल मीडिया मॅनेजरने तिच्या मृत्यूचं वृत्त दिलं होतं. याचदरम्यान, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

Vishal Gangurde

Poonam Pandey Latest News:

अभिनेत्री पूनम पांडेच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पूनमचा मृत्यू झाल्याने सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. दुसरी तिच्या मृत्यू्च्या वृत्तावरही शंका उपस्थित करण्यात येत आहे. पूनमच्या सोशल मीडिया मॅनेजरने तिच्या मृत्यूचं वृत्त दिलं होतं. याचदरम्यान, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर पूनमच्या मृत्यूच्या वृत्तावरही उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. पूनमचा मृतदेह कुठे आहे? तिच्या मृतदेहाविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. लोखंडवाला येथे राहणाऱ्या स्थानिकांकडूनही तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजारा मिळालेला नाही. मुंबईत वरळीत राहणाऱ्या बहिणीचा मोबाईल देखील स्विच ऑफ आहे.

आई आणि बहिणीचा फोन स्विच ऑफ

शुक्रवारी सकाळी पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. पूनमच्या मॅनेजरने तिचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचं म्हटलं. पूनमच्या मॅनेजरच्या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. अनेकांनी त्या पोस्टवर श्रद्धांजली व्यक्त केल्या. तिच्या मृत्यूच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे तिच्या आईचाही मोबाईल स्विच ऑफ आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक्स बॉयफ्रेंडने केलं मृत्यूच्या वृत्ताचं खंडन

पूनमच्या ड्रायव्हरने 'अमर उजाला'ला सांगितलं की, काल सायंकाळपर्यंत पूनम ही वांद्रे येथील घरात होती. त्यानंतर ती कुठेतरी बाहेर गेली. पूनमच्या एका मित्राचं म्हणणं आहे की, ती अनेक वर्षांपासून ब्रेन ट्यूमर आजारांपासून त्रस्त होती. तिचं आज सकाळी ७ वाजता निधन झालं. तर पूनमच्या कथित बॉयफ्रेंड बिपिन हेडेकरने म्हटलं की, 'पूनमला काही झालेलं नाही. ती जिंवत आहे'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT