Thackeray Family  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amit Thackeray: 'माझे वडील राजकारणात, म्हणून मी राजकारणात, अन्यथा...' अमित ठाकरे म्हणाले मग चर्चा होणारच!

राज ठाकरेंचे पुत्र राजकारणात सक्रिय होत असताना दौरेही करत आहे. अमित ठाकरे सध्या राज्यात दौरे करत आहेत. नुकतेच अमित ठाकरेंचे एक विधान बरेच चर्चेत आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्रात दौरे करत आहेत. राज ठाकरे आपल्या खास भाषण शैलीमुळे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सोबतच पुत्र अमित ठाकरेही (Amit Thackeray) चर्चेत आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवेशावरुन बरीच चर्चाही रंगत आहे. राज ठाकरेंचे पुत्र राजकारणात सक्रिय होत असताना ते दौरेही करत आहेत. अमित ठाकरे एका विधानामुळे बरेच चर्चेत आले आहे. ते विधान असे की, 'माझे वडिल राजकारणात म्हणून मी राजकारणात अन्यथा राजकारणात नसतो. सध्या राजकारणातील परिस्थिती भयावह आहे.' ही प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अमित ठाकरेंना चित्रपटातून लॉंच करण्याचा निर्णय घेतला होता पण हे सुत्र काही जुळले नाही. हा सर्व किस्सा राज ठाकरेंनी स्वत: सांगितला आहे. ते महेश मांजरेकरांच्या 'एफयू' चित्रपटाच्या म्युझिक लॉंच इव्हेंटला उपस्थित होते. तेव्हा राज ठाकरे म्हणतात, 'महेश माझ्याकडे आला आणि म्हणाला मी तुमच्या मुलाला लाँच करतो', तर मी म्हणालो, 'चित्रपटाचा नाव काय आहे'? त्यावेळी मांजरेकरांनी 'एफयू' असे उत्तर दिले. (Entertainment) (Marathi Actors)

तर पुढे राज ठाकरे म्हणतात, 'मला कळेना नक्की चित्रपटाचे नाव सांगितले की मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले.' यावर महेश मांजरेकर म्हणतात ते चित्रपटाचे नाव आहे. यावर राज ठाकरे म्हणतात, 'मी त्याला सांगितले, 'यावेळी राहू दे पुढच्या वेळी बघू, कारण बापबाहेर तेच बोलतो मुलगादेखील तेच बोलतो हे बरे दिसत नाही. पुढच्यावेळी शुभंकरोती अशा नावाचा चित्रपट असेल तर सांग.' किस्सा ऐकताना सर्वत्र हशा पिकला होता. (Marathi Entertainment News)

महेश मांजरेकर दिग्दर्शित एफयू चित्रपटात मुख्य भूमिकेत मयुरेश पेम, आकाश ठोसर, वैदेही परशुरामी, महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार यांनी केली असून चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता.

राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेला अमित ठाकरेंची मुख्य हजेरी असते. अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या खास लूकची बऱ्याचदा सर्व स्तरात चर्चा रंगते. अमित ठाकरे एक उत्तम फुटबॉल खेळाडूही आहेत. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांनी २०१९ वर्षी लगीन गाठ बांधली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

SCROLL FOR NEXT