Kartik Aryan Saam Tv
मनोरंजन बातम्या

VIDEO : चाहत्यांना भेटण्यासाठी कार्तिक आर्यनने सोडले 'शेहजादा'चे शूटिंग, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन एक असा सेलिब्रिटी आहे, जो आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने लोकांना सहज आकर्षित करतो. तो त्याच्या चाहत्यांसाठी खूप उदार आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन(kartik aaryan) एक असा सेलिब्रिटी आहे, जो आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने लोकांना सहज आकर्षित करतो. तो त्याच्या चाहत्यांसाठी खूप उदार आहे आणि त्यांना कधीही निराश करत नाही. कार्तिक नेहमीच सर्वांना नम्रतेने भेटताना दिसतो ज्यामुळे तो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

कार्तिक आर्यन हा खूप आनंदी व्यक्ती आहे ज्यामुळे तो लोकांमध्ये अगदी सहज मिसळतो. कार्तिक कितीही आपल्या कामामध्ये व्यग्र असला तरी त्याला भेटायला येणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच वेळ काढतो. असच एक दृश्य हरियाणामध्ये त्याच्या आगामी 'शहजादा'(Shehzada) चित्रपटाचे शूटिंग करत असताना पाहायला मिळालं आहे.

जेव्हा कार्तिक आर्यनच्या चाहत्यांना हरियाणामधील त्याच्या उपस्थितीबद्दल कळले, तेव्हा त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते शूटिंगच्या ठिकाणी जमले. कार्तिक आर्यनला भेटायला त्याचे चाहते आल्याचे कार्तिकला समजल्यावर तो शूटिंग सोडून त्यांना भेटायला गेला. कार्तिक आर्यन त्याच्या चाहत्यांना भेटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये एका मोठ्या गेटच्या समोर चाहते 'शेहजादा'च्या शूटिंगमध्ये व्यग्र असलेल्या कार्तिक आर्यनची वाट पाहताना दिसत आहेत. कार्तिकने शूटमधून ब्रेक घेऊन चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी शेकहॅण्ड केले. कार्तिकसोबत हात मिळवणी करण्याच्या शर्यतीत सर्व चाहते गेटवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसले.

कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच, यावर दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. 'हरियाणामध्ये 'शेहजादा' चे शूटिंग करत असलेल्या कार्तिक आर्यनची झलक पाहण्यासाठी चाहते वेडे झाले आहेत, असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT